बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त दिनांक 6 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
6 ऑगस्ट रोजी भगवद्गीतेतील चौथ्या अध्यायातील श्लोकांचे पठण, रामायण -महाभारत आणि वैदिक साहित्य यावर प्रश्नमंजुषा स्पर्धा होणार आहेत.
7 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण लीला व रामलीला यावर आधारित रंगोली काढायची आहे त्याच दिवशी कृष्ण लिलेवर फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि 9 ऑगस्ट रोजी कथाकथन स्पर्धा होणार असून श्रीकृष्णानी आपल्या बालवयात केलेल्या राक्षस वधाची माहिती द्यायची आहे.
10 ऑगस्ट रोजी भगवंताच्या जीवनावर आधारित भक्ती गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दुसरी ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन विविध गटात होणार आहेत.
अधिक माहितीसाठी इस्कॉन मंदिरा शी किंवा मोबाईल क्रमांक 9845761757 किंवा 9448 034981 वर संपर्क साधावा संबंधित शाळांकडून नावे नोंदविण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2022 ही आहे असे आवाहन इस्कॉनच्या वतीने करण्यात आले आहे