बेळगाव आणि खानापूर तालुक्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 15 जुलै आणि शनिवार दिनांक 16 रोजीअसे दोन दिवस बेळगाव शहर तालुका आणि खानापूर तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्याची घोषणा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे.
शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी असेल असेही जिल्हाधिकारी प्रसिद्धी दिलेल्या एका पत्रकात कळवले आहे.
खानापूर तालुक्यातील हालात्री नदीला पूर आल्याने पाणी रस्त्यावर आले असून परिणामी 35 गावांचा संपर्क तुटला आहे तर प्रसिद्ध हबनहट्टी येथील श्री मारुती मंदिर देखील पाण्याखाली गेलेले आहे इतक्या जोराने मलप्रभा ओसंडून वाहत आहे याशिवाय बेळगाव शहरातील सखल भागात पाणी साचलेले आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय होण्यासाठी केवळ पाच फूट शिल्लक आहे.
तर काल सायंकाळी उचगाव जवळील मार्कंडेय नदीतील पाणी शेतातून शिरले होते अशा पार्श्वभूमीवर होत असलेल्या संततधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवार आणि शनिवार हे दोन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
बेळगाव live ने देखील कालच एक बातमी करत सध्या सुरू असलेल्या चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात एक दोन दिवस शाळांना सुट्टी द्यावी अशी भूमिका मांडली होती.सुनील जाधव सारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सुट्टी द्यावी अशी मागणी केली होती.
बेळगाव जिल्हा माहिती अधिकारी गुरुनाथ कडबुर यांनी शुक्रवारी सकाळी माध्यमाना पत्रक देत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दोन दिवस सुट्टी दिल्याची माहिती दिली आहे.ते शासकीय पत्रक असे आहे
ಬೆಳಗಾವಿ, ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಶಾಲೆಗಳಿಗೆ ರಜೆ..
ವ್ಯಾಪಕವಾಗಿ ಮಳೆಯಾಗುತ್ತಿರುವ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ ತಾಲ್ಲೂಕು ಮತ್ತು ಖಾನಾಪುರ ತಾಲ್ಲೂಕಿನ ಪ್ರಾಥಮಿಕ ಹಾಗೂ ಪ್ರೌಢಶಾಲೆಗಳಿಗೆ ಇಂದು ಶುಕ್ರವಾರ(ಜು.15) ಮತ್ತು ನಾಳೆ ಶನಿವಾರ (ಜು.16) ರಜೆ ಘೋಷಿಸಲಾಗಿದೆ ಎಂದು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ನಿತೇಶ್ ಪಾಟೀಲ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ.
***