कर्नाटक सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुशखबर देताना राज्य सरकारी नोकरी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या फुफ्फुस तसेच हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. कर्नाटक राज्य सरकारी नोकरर संघाचे राज्याध्यक्ष सी. एस. षडाक्षरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
कर्नाटक राज्य सरकारी नोकरर संघाच्या अनेक दिवसांपासूनच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून राज्य सरकारी नोकर अर्थात कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या फुफ्फुस प्रत्यारोपण शिवाय हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
मुख्यमंत्र्यांनी तसा आदेशही बजावला आहे. यासाठी कर्नाटक राज्य सरकारी नोकरर संघाचे सर्व सदस्य मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि वरिष्ठ राज्य सरकारी अधिकाऱ्यांचे आभारी आहेत.
राज्य सरकारी नोकर अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या फुप्फुस प्रत्यारोपणासाठी 15 लाख रुपयांचा निधी तर हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी 15 लाख रुपये अधिक फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या निधीची अर्धी रक्कम वैद्यकीय मदतीच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे, असा तपशील प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.