कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे असताना देखील नागरिकांकडून येथे तिथे कचरा टाकण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.
नदीत कचरा फेकू नये याबद्दल सातत्याने जागृती करण्यात येत असते मात्र तरी देखील त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आता नदीत कचरा टाकण्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून नदीत कचरा टाकताय तर सावधान…..
बेळगाव कंग्राळी खुर्द गावाच्या शेतवाडीतून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीत कचरा टाकण्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. ग्राम स्वच्छता व निधी स्वच्छता अभियानांतर्गत नदीत कचरा टाकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे तरी देखील गावाच्या बाहेरील लोक तसेच नदीच्या पुलावरून ये जा करणारे लोक नदीत कचरा टाकताना दिसतात.
नदीच्या पाण्यात कचरा टाकल्यामुळे सदर नदीचे पाणी पाण्याच्या प्रवाहाबरोबर शेतवडीत जाते त्यामुळे शेतकऱ्यांच्या व जनावरांच्या पायाला जखमा तसेच शेतीला या कचऱ्याचा फटका बसत आहे .
रविवारी डुक्करवाडी येथील एक व्यक्ती नदीत कचरा टाकताना गावातील नागरिकांना आढळली त्यांनी कंग्राळी ग्रामपंचायतीला कळवत ग्रामपंचायत सदस्यांना फोन केला व त्यांच्याशी संपर्क साधून नदीत कचरा फेकणाऱ्या व्यक्तीला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, राकेश पाटील ,विनायक कम्मार तसेच ग्रामस्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मनोहर पाटील व गावडे कमिटीचे गजानन पाटील उपस्थित होते.