बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी गावातील 45 वर्षीय शेतकरी यल्लाप्पा तरळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली असून बुधवारी सकाळी सदर घटना लक्षात आली आहे.
यल्लाप्पा तरळे यांनी शेतातील झाडाच्या फांदीला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली आहे.
यल्लाप्पा यांचीही शेती होती त्यांना कर्ज झाले होते .परिणामी कर्जबाजारीपणामुळे त्यांची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची नोंद पोलीस स्थानकात झाली असून पोलीस निरीक्षक गुरुनाथ आणि सहकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला.