Thursday, May 2, 2024

/

….येथे झाली विद्युत अदालत…

 belgaum

शेतातील विद्युत खांब व्यवस्थित करून देणे,वेळ वाढवून देणे ,विजेचे जुने खांब बदलून देणे, नवीन खांब बसवणे गावातील खाजगी जागेतील ट्रान्सफॉर्मर बदलणे अशा विविध समस्या मांडत गावातील विद्युत व्यवस्था अचूक करावी अशी मागणी गावातील नागरिकांनी विद्युत अदालत मध्ये केली आहे .

येळूर ग्रामपंचायत हद्दीतील अवचारहट्टी या गावांमध्ये शनिवारी सकाळी हेस्कॉम च्या वतीने विद्युत अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत अध्यक्ष तसेच सदस्य यांनी विविध समस्या मांडल्या.सकाळी.सदर विद्युत अदालत संपन्न झाली.

यावेळी अवचारहट्टी गावामधील नागरिकांनी विजेच्या समस्या मांडल्या .विजेचे जुने खांब बदलून नवीन खांब बसवणे , गावातील खाजगी जागेत असणारे ट्रांसफार्मर सरकारी जागेत बसवणे , तसेच जुने खांब बदलणे शेतातील विद्युत खांब व्यवस्थित करून देणे अशा विद्युत विषयक जाणविणाऱ्या अडचणी नागरिकांनी या अदालतीमध्ये मांडल्या.Vidhyut adalat

 belgaum

तसेच यरमाळ रोड शेजारी असलेल्या सोमनाथ मंदिर मधील खांबावरुन केबल घालून नविन मीटर बसविने, गावाच्या स्मशानभूमित विजेची सोय करुण देणे. अशा प्रकारच्या सूचना हेस्कॉमकड़े मांडण्यात आल्या.

यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा पाटिल यांनी येळ्ळूर गावची हेस्कॉम ची लाईट बिल तसेच बाकी सर्व बिल ही 100% भरलेली आहेत .आज पर्यंत कोणतीही थकबाकी नाही यामुळे विजेच्या संदर्भातील सर्व कामे 100% पूर्ण करून द्यावीत अशी सूचना केली,यावेळी ग्राम पंचायत सदस्य कल्लाप्पा मेलगे, हेस्कॉम अधिकारी पवन कुमार, शीतल संनदी, आय डी लोबो,रामलिंग बेळगावकर व लाइनमन गौंडवाड़कर व मोहन तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.