भविष्यात राज्यात पुन्हा काँग्रेस सत्तेवर येणार नाही. सिद्धरामय्या व डि. के. शिवकुमार हे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत आणि त्यांचे ते स्वप्न स्वप्नच राहणार आहे, असा टोला अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी लगावला.
कर्नाटकात काँग्रेसमध्ये खुर्चीवरून सुरू असलेल्या घमासाना संदर्भात विजापूर येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री कत्ती बोलत होते.
काँग्रेसमध्ये खुर्चीवरून अंतर्गत मतभेद सुरू आहेत मुख्यमंत्रीपदासाठी आतापासूनच रस्सीखेच सुरू असली तरी राज्यात पुन्हा काँग्रेस सत्तेवर येणार नाही.
भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर येईल हे भविष्य आहे भाजप योग्य शासन चालवत आहे त्यामुळे पुढील काळात देखील राज्यात भाजपचीच सत्ता येईल असा विश्वासही उमेश कत्ती यांनी व्यक्त केला.