Thursday, May 16, 2024

/

‘या’ संरक्षक भिंतीकडे रेल्वे खाते लक्ष देईल का?

 belgaum

काँग्रेस रोडवरील मिलिटरी महादेव मंदिरापासून दुसऱ्या गेटकडे जाताना डाव्या बाजूला दिसणारी रेल्वे मार्गाची संरक्षक भिंत कोसळण्याच्या स्थितीत असून ती वेळीच दुरुस्त करण्याची मागणी केली जात आहे.

रेल्वे खात्याकडून गोगटे सर्कलपासून काँग्रेस रोडवरील तिसऱ्या गेटपर्यंत रस्त्याशेजारी रेल्वे संरक्षक भिंत उभारली आहे. सिमेंटच्या पट्ट्या वापरून तयार करण्यात आलेली या रेडिमेड भिंतीचे काम कांही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे सदर भिंत उभारल्यानंतर पहिल्याचवर्षी या भिंतीचा कांही भाग कोसळला आहे. सध्या मिलिटरी महादेव मंदिरापासून दुसऱ्या गेटकडे जाताना मेजर रामस्वामी अव्हेन्यू क्रॉस ओलांडल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूची ही संरक्षक भिंत मोठ्या प्रमाणात रेल्वे मार्गाच्या दिशेने कोसळण्याच्या स्थितीत कलली आहे. त्याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

 belgaum

सदर रेल्वे संरक्षक भिंत ही काँग्रेस रोडवरील डाव्या बाजूच्या फूटपाथला लागून उभारण्यात आली आहे. या सिमेंटच्या रेडिमेड संरक्षक भिंतीचे बांधकाम कांही ठिकाणी निकृष्ट झाल्याने वरील प्रमाणे कांही ठिकाणी ती कललेल्या अवस्थेत असण्याबरोबरच ठिकठिकाणी खचली देखील आहे. निकृष्ट बांधकामामुळे या पद्धतीने कललेली आणि खचलेली ही भिंत धडधडत जाणाऱ्या रेल्वेच्या हादऱ्यामुळे कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेस रोडवरील फुटपाथवर ठराविक अंतरावर लहान विक्रेते विविध साहित्य, फळ आदींची विक्री करतात. याखेरीज फूटपाथ करून पादचारी आणि शाळकरी मुलांची ये -जा सुरू असते. तेव्हा रेल्वे संरक्षक भिंतीमुळे एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी रेल्वे खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन ठिकठिकाणी कमकुवत झालेली ही रेल्वे संरक्षक भिंत तातडीने दुरुस्त करून सुरक्षित करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.