शनिवारी सकाळी बेळगाव भाजप कार्यालयात राज्य भाजप प्रवक्ते एम जी महेश यांची पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ‘सुवर्णसौध मध्ये राज्यस्तरीय कार्यालये स्थलांतर झाली तरच बेळगावचा विकास होईल असे म्हणणे चुकीचे आहे’ असे वक्तव्य केले होते. या त्यांच्या वक्त्याने बेळगावतील कानडी संघटनांचा तीळपापड झाला आहे.
बेंगळूर मधील राज्यस्तरीय कार्यालय बेळगावातील सुवर्ण सौध मध्ये स्थलांतर करा ही जुनी मागणी बेळगाव येथील कानडी संघटनांची आहे त्यामुळे भाजपच्या प्रवक्त्याने असे वक्तव्य केल्याने त्यांनी त्या वक्तव्याने त्यांचा तीळपापड झाला असून कानडी संघटना या वक्तव्याचा जोरदार समाचार घेत आहेत.
बेळगावातील सुवर्ण सौध कार्यालयात बेंगलोर विधान सौध मधील राज्यस्तरीय कार्यालये स्थलांतरित करण्याबाबतचा निर्णय राज्य सरकार घेईल. कार्यालये स्थलांतर झाली तरच या भागाचा विकास होईल असे म्हणणे चुकीचे आहे आणि हा प्रश्न म्हणजे काश्मीरचा प्रश्न आहे असे नव्हे” असं त्यांनी म्हटलं होतं.शासकीय कार्यालय स्थलांतरित केल्याने केवळ इमारतीचा विस्तार वाढतो असेही महेश यांनी यांनी यावेळी म्हटले होते.
उत्तर कर्नाटक वेगळ्या राज्याची मागणी करणाऱ्या उमेश कत्ती बाबत बोलताना त्यांनी सावधपणे भूमिका घेत उमेश कत्ती हे केवळ भाजपचे आमदार आहेत त्यांची भूमिका म्हणजे पूर्ण भाजपची भूमिका नव्हे त्यामुळे त्यांच्या विधानाशी भाजप सहमत नाही असे स्पष्ट केले
दरम्यान, भाजप मुख्य प्रवक्ता एम. जी. महेश यांनी सुवर्णसौधमध्ये कार्यालये स्थलांतरित करण्याबाबतचे विधान केल्याबरोबर कन्नड संघटनांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कन्नड संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी या विधानाला आक्षेप घेतला आहे. गेल्या अनेक्क वर्षांपासून सीमाभागाचा विकास झाला पाहिजे यासाठी आम्ही लढा देत आहोत, सुवर्णसौधमध्ये कार्यालये स्थलांतरित करण्यासाठी आंदोलने करत आहोत, त्यात आता भाजप प्रवक्त्याने असे विधान करण्याला मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांची सहमती आहे का असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान भाजप प्रवक्ते एम जी महेश यांच्या वक्तव्याचा कानडी संघटनांनी जोरदार समाचार घेतला असून निषेध आणि आंदोलन सुरू केलेले आहेत त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये हा वाद किती पेटतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.