बेळगाव शहरातील सर्वात जुने असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून श्रावण मासानिमित्त संगीत भजन स्पर्धा भरविल्या जातात. स्पर्धा आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे. यंदाची स्पर्धा बुधवार दि. 24 ते रविवार 28 आगष्ट 2022 या पाच दिवसांच्या कालावधीत दररोज दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेली आहे.
सदर स्पर्धा महिला व पुरुष अशा दोन गटात होणार आहे व या दोन्ही गटांना सम-समान रोख रकमेची बक्षिसे देण्यात येणार आहेत. सदर स्पर्धा बेळगाव शहर, बेळगाव, खानापूर व चंदगड तालुका या विभागासाठी मर्यादित आहे.
या स्पर्धेतील महिला व पुरुष गटांसाठी प्रत्येकी दहा बक्षिसे आहेत ती विभागून दिली जाणार नाहीत. याशिवाय स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट तबला, मृदंग व पेटीवादक आणि गायक यांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धेत नाव नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक 14 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. स्पर्धेचे माहिती पत्रक कार्यालयात उपलब्ध असून सदर विभागातील इच्छुक भजनी मंडळांनी अधिक माहितीसाठी संस्थेच्या गणपत गल्ली, बेळगाव येथील मुख्य कार्यालयात शनिवार सुट्टी खेरीज सकाळी 10 ते दुपारी 1 व दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष नेताजी जाधव व कार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी केले आहे.