अमरनाथ यात्रेला गेलेली बेळगावची एक महिला कालपासून नॉट रिचेबल झाली होती त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना तिची काळजी वाटू लागली होती मात्र अखेर आज तिचा मोबाईलवर संपर्क झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
बेळगाव जवळील बसवण कुडची येथील महिला सीमा बेळगूर या 5 जून रोजी अमरनाथ यात्रेला देव दर्शनाला गेल्या होत्या तिच्या कुटुंबीयांनी कितीही फोन केला तरी तिचा फोन बंद येत होता त्यामुळे तिचे कुटुंबिय चिंतेत होते.
अखेर त्यांचा संपर्क झाला असून त्यांच्या पती सुधाकर बोलणं झालं असून लवकरचं सुखरूप परतणार असे सांगितले आहे.
अमरनाथ यात्रेला देवदर्शनासाठी गेलेल्या लोकांचा ढगफुटी पावसाने मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबियांना काळजी लागली होती अखेर ती सुखरूप असल्याची बातमी मिळाल्याने कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला आहे.