देशाच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ड्रोन आणि ड्रोनशी संबंधित घटक तयार करण्यासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत (पीएलआय) 23 लाभार्थींची तात्पुरती यादी जाहीर केली असून त्यामध्ये ड्रोनचे घटक निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्ये बेळगावच्या सर्व्हो कंट्रोल्स एरोस्पेस इंडियाचा समावेश आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीमध्ये 12 ड्रोन तयार करणाऱ्या कंपनी आणि 11 ड्रोनची संबंधित घटक अर्थात उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. या संदर्भात मंत्रालयाने पात्र उत्पादक कंपन्यांकडून गेल्या 4 मे रोजी अर्ज मागविले होते आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 मे 2022 ही होती.
उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेअंतर्गत 2021 -22 सालातील लेखापरीक्षण न केलेले आर्थिक परिणाम आणि इतर माहितीच्या आधारे लाभार्थींची तात्पुरती यादी तयार करण्यात आली आहे. पीएलआय योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या यादीतील ड्रोन उत्पादक कंपन्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
अरव अनमेन्ड सिस्टीम बेंगलोरु कर्नाटक, एस्टेरिया एरोस्पेस बेंगलोर कर्नाटका, दक्ष अनमेन्ड सिस्टीम्स चेन्नई तामिळनाडू, एंड्युअर एअर सिस्टीम नोएडा उत्तर प्रदेश, गरुडा एरोस्पेस चेन्नई तामिळनाडू, आयडा फोर्ज टेक्नॉलॉजी मुंबई महाराष्ट्र, व्ही लो टेकवर्ल्ड एव्हिएशन गुरुग्राम हरियाणा, ओमनीप्रेझेंट टेक्नॉलॉजीस गुरुग्राम हरियाणा, राफी एमफीबर नोएडा उत्तर प्रदेश, रोटर प्रिसिएशन इन्स्ट्रुमेंट्स रूरकी उत्तराखंड, सागर डिफेन्स इंजीनियरिंग पुणे महाराष्ट्र, थ्रोटल एरोस्पेस सिस्टिम्स बेंगलोर कर्नाटक.
यादीतील ड्रोनचे घटक उत्पादन करणाऱ्या कंपन्या पुढील प्रमाणे आहेत. अब्सोल्युट कंपोझिट्स बेंगलोर कर्नाटका, अदानी इलबिट ऍडव्हान्स सिस्टीम्स इंडिया हैदराबाद तेलंगणा, एब्रोयटिक इन्फॉर्मेशन सिस्टिम्स नवी दिल्ली, अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजी बेंगलोर, कर्नाटका डायनामिक इंजीनियरिंग हैदराबाद तेलंगणा, इमॅजिनरी रॅपिड मुंबई महाराष्ट्र, सेसमॉस हिट टेक्नॉलॉजी बेंगलोर कर्नाटका, सर्व्हो कंट्रोल्स एरोस्पेस इंडिया बेळगाव कर्नाटका, व्हलडेल ॲडव्हान्सड टेक्नॉलॉजी बेंगलोर कर्नाटका, झेड मोशन ऑटोनॉमस सिस्टिम्स बेंगलोर कर्नाटका, झुप्पो जिओ नेवीगेशन टेक्नॉलॉजी चेन्नई तामिळनाडू.