बेळगाव शहरातील उद्यमबाग औद्योगिक वसाहतीमध्ये एक युवकाचा निघृण खून करण्यात आल्याची घटना आज भल्या पहाटे उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
यल्लेश शिवाजी कोलकर (वय 27) असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नांव आहे. उद्यमबाग येथे कोणा अज्ञातांकडून यल्लेश याची निघृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार आज सकाळी निदर्शनास आला.
मयत यल्लेश हा आंबेडकरनगर येथील रहिवासी असल्याचे समजते. तसेच अनैतिक संबंधातून हा खुनाचा प्रकार घडला असावा असा कयास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
खुनाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्याचप्रमाणे मृत यल्लेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे धाडला. याप्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे.