शहराच्या कॅन्टोनमेंट विभागातील विविध ठिकाणची सुमारे 250 झाडे यापूर्वीच तोडण्यात आलेली असताना आता नव्याने 936 झाडे तोडण्यास बेळगाव वन खात्याने परवानगी दिली आहे.
निसर्गसंपन्न अशा कॅन्टोन्मेंट विभागातील झाडांची कत्तल केली जाऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक शंकर पाटील यांचे प्रयत्न सुरू असताना वनखात्याने वरीलप्रमाणे झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कॅन्टोनमेंट विभागातील जेएलआर सर्व्हे नं. 50 मधील 71 झाडे, जेएलआर सर्व्हे नं. 44 मधील 358 झाडे, जेएलआर सर्व्हे नं. 183 मधील 293 अशी विभिन्न जातींची 722 झाडे अधिक अन्य ठिकाणची 214 झाडे अशी एकूण 936 झाडे तोडण्याची परवानगी बेळगाव वनखात्याने दिली आहे.
अंगडी कॉलेज रोड, सावगाव रोड, फॅमिली कॉर्टर ते ट्रेनिंग एरिया गेट, केएलपी एरिया सर्व्हे नं. 183, नानावाडी -सावगाव रोड आदी ठिकाणच्या झाडांचा तोडल्या जाणाऱ्या झाडांमध्ये समावेश असणार आहे.
या सर्व झाडांसाठी निविदा शुल्क 17 लाख 67 हजार इतके असून वन विकासासाठीचे 12 टक्के याप्रमाणे 2 लाख 12 हजार 40 रुपये इतके शुल्क वन खात्याकडे जमा झाले आहे.