केएलई विश्वविद्यालय, डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्र, जे. एन. मेडिकल कॉलेज बेळगाव आणि अनिल बेनके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली उद्या शनिवार दि. 25 जून रोजी सकाळी 9 वाजता बृहत् मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.
रुक्मिणीनगर सरकारी शाळेच्या आवारात आयोजित केल्या जाणाऱ्या सदर शिबिरात केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयाचे तज्ञ डॉक्टर व शल्यचिकित्सक, हाडांचे डॉक्टर, स्त्री रोग तज्ञ, लहान मुलांचे डॉक्टर, नेत्र चिकित्सक, कान-नाक-घसा तज्ञ, चर्मरोग तज्ञ, श्वास कोश व हृदयरोगासह इतर रोग तज्ञ, मूत्रपिंड शस्त्र चिकित्सक आणि कॅन्सर शस्त्र चिकित्सक रुग्णांची उचित तपासणी करून सल्ला देणार आहेत.
याखेरीज दात दुखीवर उचित चिकित्सा करून मोफत औषध दिले जाईल. शिबिरात बीपी व शुगर तपासण्याची विशेष व्यवस्था केली जाणार आहे. आवश्यकता भासल्यास संबंधित रुग्णांना हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी वाहनांची तसेच इतर व्यवस्थाही केली जाईल.
सदर शिबीराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांनी पूर्वनोंदणीसाठी 9731622285 या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी जनसंपर्क विभाग केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल बेळगाव दूरध्वनी क्र. 0831 -2473777 /1783 /1790 /1116 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.