Saturday, December 21, 2024

/

दुर्मिळ प्रामाणिकपणा : दागिने, रोख रकमेची बॅग केली परत

 belgaum

बेळगाव शहरातील हेमु कलानी चौक येथे हरवलेली सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली लेडीज हॅन्ड बॅग कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव Liveच्या सहकार्याने हालगा येथील नेत्रा धामणकर या महिलेला सुखरूप परत केल्याची घटना आज मंगळवारी घडली.

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, हालगा येथील प्रशांत धामणेकर हे गेल्या शुक्रवारी दुपारी आपली पत्नी नेत्रा समवेत बेळगावातील दवाखान्याला आले होते. त्यावेळी हेमु कलानी चौकामध्ये नेत्रा धामणेकर यांची लेडीज हॅन्डबॅग हरवली होती. सदर बॅग कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांना सापडली होती. तेंव्हा कार्यकर्त्यांनी त्या बेवारस लेडीज हॅन्डबॅगसंदर्भात बेळगाव लाईव्हला माहिती दिली.

त्यानंतर बेळगाव लाईव्हने सदर बॅगेच्या मालकाचा शोध घेण्यासाठी बेळगाव live ने बातमी प्रसारित केली होती. सदर बातमी पाहून धामणेकर कुटुंबाने बेळगाव लाईव्हशी संपर्क साधल्यानंतर आज मंगळवारी सकाळी ओळख पटवून एकता युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण तोपिनकट्टी व सिद्धार्थ भातकांडे,राजू हुबळकर बाळू काकतकर यांच्या पुढाकाराने ती बॅग प्रशांत धामणेकर आणि त्यांची पत्नी नेत्रा धामणेकर यांच्याकडे सुपूर्द केली.

तब्बल तीन दिवसांनी सुमारे 1 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे गंठण आणि रोख रक्कम असलेली बॅग प्रामाणिकपणे सुखरूप परत मिळाल्याबद्दल धामणेकर दाम्पत्याने कार्यकर्ते आणि बेळगाव लाईव्हचे शतशः धन्यवाद दिले. याप्रसंगी एकता युवक मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.Ekta yuvak mandal

यासंदर्भात ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना सिद्धार्थ भातकांडे म्हणाले की, गेल्या शुक्रवारी दुपारी 3:30 च्या सुमारास मुसळधार पाऊस होता. त्यावेळी धामणेकर पती-पत्नी आसऱ्यासाठी हेमू कलानी चौक येथील प्रसाद हुब्बळकर यांच्या घराच्या जिन्याखाली थांबले होते. त्यानंतर घरी जाण्याच्या घाईत नेत्रा धामणेकर आपली लेडीज हॅन्डबॅग जिन्याखालील विसरल्या. त्यावेळी माझ्यासह आमचे कार्यकर्ते ईश्वर प्रेमानंद नाईक, प्रसाद हुब्बळकर, अमित सरनोबत व संतोष हुबळी असे आम्ही सर्वजण नजीकच गप्पा मारत बसलो होतो.

तेंव्हा ती बॅग आमच्या निदर्शनास आली. त्यावेळी बॅगेच्या मालकाचा शोध घेण्यासाठी आम्ही बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी लागलीच आपल्या डिजिटल मीडियातून बातमी प्रसिद्ध केली. ज्यामुळे ती लेडीज हॅन्डबॅग मूळ मालकाकडे परत करणे आम्हाला शक्य झाल्याचे भातकांडे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.