राज्यसभेत चौथ्यांदा निवडून गेल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांचा सत्कार बेळगाव शिवसेनेच्या वतीने करण्यात आला सहसंपर्कप्रमुख अरविंद नागनुर यांनी सत्कार करत संजय राऊत यांना त्यांच्या चौथ्या टर्म च्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
या अगोदर संजय राऊत यांनी तीनदा राज्यसभेवर शिवसेनेचे नेतृत्व केलेला आहे आता दिल्ली दरबारी आणखी सहा वर्षे चौथ्यांदा संजय राऊत सेनेचे प्रतिनिधित्व करणार आहेत .
महाराष्ट्रात राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत सहा जागांत तीन भाजप तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे.
संजय राऊत यांची शिवसेनेच्या कोट्यातून राज्यसभेवर निवड झाली आहे तर राष्ट्रवादीच्या कोट्यातून प्रफुल पटेल काँग्रेसमधून इम्रान प्रतापगडी आणि भाजपमधून पियुष गोयल अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांची निवड झाली आहे.
संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी जाऊन अरविंद नागनूरी यांनी बेळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी कांजूर मार्गच्या माजी नगरसेविका सुवर्णा कारंजे, कांजूर शिवसेना शाखा बाबू ठाकूर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अगदी खालच्या पातळीवर गेलेला नीच माणूस