Tuesday, April 30, 2024

/

आपल्या भागात ‘ही’ कामे सुरू आहेत का? करा शहानिशा

 belgaum

बेळगाव महापालिका, बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड, सार्वजनिक बांधकाम खाते आणि विविध अन्य एजन्सीद्वारे गटार बांधकाम रस्ते आदींवर कोट्यावधी रुपये खर्च केले जात असताना आपल्या भागात कोणतीच कामे होत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. तथापि शहरात विविध विकास कामे सुरू असून त्यांचा तपशील खाली नमूद आहे. या तपशीलात तुमच्या भागाचे नांव असेल तर त्यानुसार संबंधित कामं सुरू आहे की नाही? की नुसते कागदी घोडे नाचवले जात आहेत? याची शहानिशा नागरिकांनी करावी.

बऱ्याचदा नागरिकांना आपल्या प्रभागात हाती घेण्यात आलेल्या विकासकामांची कल्पनाच नसते. असे होता कामा नये आपलेच पैसे या विकास कामासाठी खर्च केले जात असल्यामुळे या कामांच्या बाबतीत प्रत्येकाने जागरूक असले पाहिजे. कर्नाटक सार्वजनिक बांधकाम खात्याने भुयारी गटार युजीडी लाईन रस्त्यांची सुधारणा ड्रेनेज बांधकाम आदी कामांसाठी पुढील प्रमाणे निविदा काढल्या आहेत. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील भाग्यनगर क्रॉस रोड 9, 11 व 12 आदर्श ते आनंदनगर, येळ्ळूर रोड, बाळकृष्णनगर अनगोळ -वडगाव रोड, लोहार गल्ली, झेरे गल्ली, अनगोळ वड्डर गल्ली, भेंडीगेरी गल्ली, जाधवनगर, बदामनजी मळा आणि सुखकर्ता कॉलनीपर्यंत अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन उपलब्ध करून देणे – 37866056.43 रु.

बेळगाव उत्तर मतदारसंघातील तानाजी गल्ली आणि आसपासचा परिसर संभाजी गल्ली आणि आसपासचा परिसर महाद्वार रोड, कपलेश्वर रोड ते माणिक बाग, तांगडी गल्ली, रामा मेस्त्री अड्डा, ताशिलदार गल्ली आणि आसपासचा परिसर, फुलबाग गल्ली आणि आसपासचा परिसर, देशपांडे पेट्रोल पंप ते यश हॉस्पिटल येथील रस्त्यांची सुधारणा आणि ड्रेनेज बांधकाम – 39910935.45 रु. भातकांडे गल्ली, मेणसे गल्ली, बुरुड गल्ली, भोई गल्ली, कामत गल्ली, माळी गल्ली, कसाई गल्ली, समादेवी गल्ली, रिसालदार गल्ली, गवळी गल्ली, गणाचारी गल्ली, कंग्राळी गल्ली, गोंधळी गल्ली बस स्टँड ते वनिता विद्यालय आणि आसपासचा परिसर येथील रस्ते आणि ड्रेनेजची सुधारणा – 36448584.34 रु.Pwd logo

 belgaum

बेळगाव उत्तर मतदार संघातील कॅन्टोन्मेंट हद्दीतील कॅम्प येथील रस्त्याची सुधारणा, नाले (सीसी ड्रेन) बांधकाम आणि इतर कामे – 15305018.51 रु. उत्तर मतदारसंघातील वंटमुरी कॉलनी, श्रीनगर, अंजनेयनगर, महांतेशनगर, भारत कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, रुक्मिणीनगर येथील रस्त्यांची सुधारणा आणि नाल्यांचे बांधकाम – 39585387.93 रु. बेळगाव उत्तर मतदारसंघातील संगमेश्वरनगर, शाहूनगर, अन्नपूर्णा वाडी, मार्कंडेयनगर, ज्योतीनगर, रामनगर, उषा कॉलनी, बॉक्साइट रोड अंतर्गत रस्ते, बॉक्साइट रोड, वैभवनगर, यमुनापूर आणि आसपासचा परिसर येथील रस्त्यांची सुधारणा आणि नाले बांधकाम – 31523432.96 रु.

उत्तर मतदारसंघातील सदाशिवनगर, जाधवनगर, रेल नगर, आंबेडकरनगर, कंग्राळकर कॉलनी, विश्वेश्वरय्यानगर, हनुमाननगर, टीव्ही सेंटर आणि आसपासचा परिसर येथील रस्त्यांची सुधारणा व नाला बांधकाम – 42084654.91 रु. नेहरूनगर, सुभाषनगर, कमिशनर ऑफीस ते वीरभद्र मंदिर, सिव्हिल हॉस्पिटल, अशोकनगर ॲडहोकेट लाईन, अशोकनगर, शिवबसवनगर, रामदेव हॉटेल मागील कन्नड भवन येथील रस्त्यांची सुधारणा व नाला बांधकाम – 37060498.40 रु.

उत्तर मतदारसंघातील वीरभद्रनगर, गांधीनगर, मारुतीनगर, उज्वलनगर, अमननगर, न्यू गांधीनगर, असदखान सोसायटी, मोहिते प्रॉपर्टी मागील एससी मोटर्स, बसवन कुडची आणि देवराज अर्स कॉलनी येथील रस्त्यांची सुधारणा व नाला बांधकाम – 37899470.82 रु. बेळगाव उत्तर मतदार संघातील शिवाजीनगर येथील नाल्याच्या बांधकामासह रस्त्यांचा विकास आणि इतर कामे – 15998495.95 रु.

उत्तर मतदारसंघातील खडक गल्ली, टोपी गल्ली, काकती वेस, जालगार गल्ली, कोळी गल्ली, इंदिरा कॉलनी, भडकल गल्ली, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, जिल्हा पंचायत ऑफिस, सरदार हायस्कूल, काकती वेस, पोलीस लाईन ते काळी अमराई येथील नाल्याच्या बांधकामासह रस्त्यांचा विकास आणि इतर कामे –33706765.42 रु. कोनवाळ गल्ली, रेडिओ थिएटर (रेडिओ कॉम्प्लेक्स), कोनवाळ गल्ली मेन, रामलिंग खिंड, टिळक चौक सर्कल, अनसुरकर गल्ली, केळकर बाग येथील रस्त्यांची सुधारणा आणि नाले बांधकाम – 32845172.00 रु. उत्तर मतदारसंघातील पाटील गल्ली, पाटील मळा, मुजावर गल्ली, मेन रोड, ओल्ड भाजी मार्केट ते पोस्टमॅन सर्कल, कुलकर्णी गल्ली, अनंतशयन गल्ली, शेरी गल्ली, कलमठ रोड, नरगुंदकर भावे चौक ते शनी मंदिर, देशपांडे गल्ली, बसवान गल्ली येथील रस्त्यांची सुधारणा आणि नाले बांधकाम – 33262120.15 रु.

बेळगाव दक्षिण मतदार संघातील भवानीनगर (लक्ष्मी गल्ली), शिवाजी रोड फर्स्ट क्रॉस आणि सेकंड क्रॉस, आगरकर रोड, नेहूरनगर, द्वारकानगर पहिला व चौथा क्रॉस येथील आरसीसी नाला बांधकाम – 14826662.29 रु. दक्षिण मतदार संघातील मठ गल्ली, हट्टीहोळ गल्ली, शास्त्रीनगर चौथा व पाचवा क्रॉस, भेंडवड गल्ली शहापूर येथील नाला बांधकाम – 13395492.38 रु. दक्षिण मतदार संघातील दैवज्ञ मंगल कार्यालयासमोरील हुलबत्ते कॉलनी, चिंतामणराव कॉलेज समोरील मीरापुर गल्ली, तंबिट गल्ली, नार्वेकर गल्ली, कुलकर्णी गल्ली, हरिजन वाडा होसुर, शहापूर दाणे गल्ली येथील नाला बांधकाम – 11719831.08 रु. अन्नपूर्णेश्वरी कॉलनी, केशव कॉलनी, संभाजीनगर, रणझुंजार कॉलनी येथील आरसीसी नाला बांधकाम – 17794904.81 रुपये.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.