Tuesday, December 24, 2024

/

‘ज्योती-बी.के.’मध्ये वनमहोत्सव, व्याख्यान संपन्न

 belgaum

जमीन, जंगल, पाणी, हवा म्हणजे थोडक्यात निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करणे ही काळाची अत्यावश्यक गरज आहे. समाजामध्ये जनजागृती करून पर्यावरण विषयक अभियान राबवण्यासाठी युवा तरुण-तरुणींनी आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने पुढाकार घ्यायला हवा. निसर्ग हा भरभरून देतो त्याचे संवर्धन करणे प्रत्येकांचे कर्तव्य आहे, असे मार्गदर्शनपर विचार बेळगाव जिल्हा वन संरक्षणाधिकारी डॉ. हर्ष भानु जी. पी. यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय प्रगतिशील सामाजिक -सांस्कृतिक -साहित्य परिषद, एल्गार सामजिक साहित्य परिषद बेळगांव, माजी विद्यार्थी संघटना, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, ज्योती पदवीपूर्व महाविद्यालय आणि भाऊराव काकतकर महाविद्यालय बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित वृक्षारोपण आणि विशेष व्याख्यानाप्रसंगी प्रमुख वक्ते या नात्याने ‘पर्यावरण : संवर्धन – संरक्षण आजच्या काळात परिसराचे महत्त्व, परिणाम आणि उपाय योजना’ या विषयावर बेळगांव जिल्हा वन संरक्षणाधिकारी डॉ. हर्षा भानू जी. पी. बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. के. कॉलेजचे ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. एस.एन. पाटील होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून एल्गार परिषदचे उपाध्यक्ष पत्रकार कवी शिवाजी शिंदे, आणि ज्येष्ठ समाजसेवक दिपक पावशे यांच्यासह व्यासपीठावर प्राचार्य ज्योती महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. आर. डी. शेलार, एल्गार सामाजिक साहित्य परिषद बेळगावचे कवी प्रा. निलेश शिंदे, माजी विद्यार्थी संघटनाचे समन्वयक प्रा. डॉ. एम. व्ही. शिंदे, प्रा. डॉ. अमित चिंगळी, प्रा.व्ही. वाय. पाटील उपस्थित होते.Tree plant

यावेळी परिषदच्यावतीने वृक्षारोपण आनंतर विविध प्रकारची तीन हजारपेक्षा अधिक बीजे लावण्यात आली. प्रमुख वक्ते शिवाजी शिंदे, मनोहर हूंदरे आदींनी यावेळी आपले समयोचित विचार व्यक्त केले. प्रारंभी प्रा. डॉ. अमित चिंगळी यांनी सर्वांचे स्वागत तर प्रा. निलेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले व्यासपीठावरील पाहुण्यांचा परिचय प्रा. दिलीप वाडेकर व प्रा. व्ही. वाय. पाटील करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस. आर. चव्हाण व एम. एस. पाटील यांनी केले.

कार्यक्रमास प्रा. डॉ. डी. एन. मिसाळे, प्राचार्य आनंद पाटील, प्राचार्य बसवराज कोळुचे, प्राचार्य पि. डी. साठम , प्रा. डी. टी. पाटील, प्रा. निता पाटील, प्रा. कविता पाटील, ए. व्ही.सुतार, प्रा. अवधूत मानगे, प्रा. महादेव नार्वेकर, प्रा. राजाराम हालगेकर, प्रा. विजय शिंदे, प्रा. नारायण पाटील, सागर गुंजीकर, सुजाता गुंजीकर, सुधिर लोहार, नागराज पाटील, प्रा. विशाल करंबळकर, प्रा. एस.बी. ताटे, प्रा. एस.एस. काकतकर, प्रा. सुहास बामणे, प्रा. रामभाऊ हुद्दार, प्रा. सूरज पाटील, प्रा. महेश जाधव, जोतिबा नागवडेकर, प्रा. निता पाटील, गणपती कांबळे, प्रा. लक्ष्मण बांडगे, प्रा. संजय बंड, प्रविण पाटील, प्रा. प्रभाकर हुरुडे, प्रा. पी. एन.बसर्गे, प्रा. एम. पी. शागुनशी तसेच परिषद व मंडळाचे पदाधिकारी सदस्य कर्मचारी विद्यार्थी पालक शिक्षक -प्राध्यापक, पालक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थी समन्वयक प्रा.डॉ. एम. व्ही. शिंदे शेवटी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.