Saturday, April 27, 2024

/

‘त्या 18 खेळाडूंचा जिल्हाधिकाऱ्यांना थॅंक्यु…’

 belgaum

बेळगाव येथे अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतातअसे खेळाडू घडवण्यासाठी सर्वाधिक जास्त मेहनतघ्यावी लागते ती म्हणजे त्यांचे प्रशिक्षक यांची परंतु यावेळी बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सुद्धा खेळाडूंची दखल घेत बेळगावातील 18 जुडो खेळाडूंसाठी मदत केली.

दिल्ली येथे सुरू असलेल्या ज्युनियर एशियन स्पर्धेसाठी निवड प्रक्रिया ही पूर्ण झाल्यावर हे खेळाडू थायलंड इथे होणाऱ्या ज्युनियर एशियन स्पर्धेसाठी खेळाडू साठी निवड करण्यात येणार आहे त्यासाठी पासपोर्ट आवश्यक होते यावेळी बेळगावचे नुतन जिल्हाधिकारी यांच्याशी जुडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील यासाठी सतत प्रयत्न करत होत्या.

नूतन डी सी नितेश पाटील डी आय सी च्या जिम मध्ये दररोज व्यायाम करण्यासाठी येत असतात त्यावेळी कोच रोहिणी यांनी डी सी यांना युवा 18 खेळाडूंच्या पासपोर्टची समस्या सांगितली त्यावर पाटील यांनी तात्काळ बंगळुरू येथील पासपोर्ट रिजनल कमिशनर यांच्याशी चर्चा करून अवघ्या चार दिवसात पासपोर्ट तयार करून दिले.Judo

 belgaum

बेळगावची जुडो प्रशिक्षिका रोहिणी पाटील यांनी थेट जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना अवघ्या चार दिवसात पासपोर्ट तयार करून दिले व त्यांचे सहकार्य लाभले.बेळगाव येथील खेळाडूंना कोणत्याही गोष्टीची कमतरता न बसता व खेळाडूंसाठी कुठेही अडचण येऊ नये याकडे जातीन लक्ष देऊन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी खेळाडूंना मदत केली तात्काळ पासपोर्ट बनवून दिले आहेत.

ज्यूडोचे ते 18 खेळाडू सध्या दिल्लीमध्ये थायलंडमध्ये होणाऱ्या स्पर्धेसाठी ट्रायल मॅचेस खेळत आहेत या ट्रेलरमध्ये हे विजयी झाल्यास त्यांची थायलंडमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. डीसी नितीश पाटील यांनी केवळ चार दिवसात पासपोर्ट मिळवून दिल्याने त्या खेळाडूंनी भार व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना थँक्यू म्हणत एक व्हिडिओ शेअर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.