Thursday, December 26, 2024

/

जीएसटीच्या पाचव्या वर्धापन दिनी बेळगाव आयुक्तालय अव्वल

 belgaum

देशातील वस्तू आणि सेवा कर आकारणी जीएसटी पद्धतीच्या यशस्वी अंमलबजावणीला येत्या 1 जुलै 2022 रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. जीएसटीच्या या पाचव्या वर्धापन दिनाप्रित्यर्थ केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अप्रत्यक्ष कर केंद्रीय मंडळाने ‘जीएसटी@5 : सदन देश की सर्वांगीण विकास का’ ही थीम अर्थात संज्ञा जाहीर केली आहे.

पाच वर्षाच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय उत्तर कर्नाटकातील 12 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या करदात्यांच्या अपवादात्मक कामगिरीसह बेळगाव सीजीएसटी आयुक्तालय अधिकाऱ्यांच्या प्रशंसनीय कामगिरीला समर्पित करण्यात आले आहे.

गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत उत्तर कर्नाटकातील जिल्हे आणि बेळगाव सीजीएसटी आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध भागधारकांशी संवाद साधून प्रशासकीय कामगिरी बजावली आहे. 2021 -22 या आर्थिक वर्षात जीएसटी संकलनाने नवी उंची गाठत आर्थिक वाढीचे संकेत दाखविली. अखिल भारतीय पातळीवर जीएसटी संकलनामध्ये मुंबईनंतर कर्नाटक विभागाने 48,440 कोटी रुपये जीएसटी संकलनासह दुसरा क्रमांक पटकाविला आहे.Cgst bgm office

कर्नाटकमध्ये 2021 -22 या वर्षात बेळगाव सीजीएसटी आयुक्तालयाने सर्वाधिक म्हणजे 10,172 कोटी रुपये इतका महसूल जमा केला आहे. मागील वर्षीच्या 7124 कोटी रुपयांच्या तुलनेत यावेळच्या महसुलात 43 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मेसर्स जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड ही राज्यातील सर्वाधिक जीएसटी भरणारी कंपनी आहे. जिचा बेळगाव आयुक्तालयाच्या महसुलामध्ये सिंहाचा वाटा आहे. या कंपनीने 3,974 कोटी रुपये जीएसटी भरला आहे. बेळगाव सीजीएसटी आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बेळगाव धारवाड, गदग, कोपळ, विजयनगर, बेळ्ळारी, रायचूर, यादगिरी, गुलबर्गा, बिदर, विजयपुरा आणि बागलकोट या जिल्ह्यांमधील दोलायमान आणि मजबूत आर्थिक क्रियाकलापाचे हे संकेत आहेत. बेळगाव सीजीएसटी आयुक्तालय हे कर्नाटक झोनमधील सर्वात मोठे आयुक्तालय आहे.

या आर्थिक वर्षात बेळगाव जीएसटी आयुक्तालयाने आपल्या करदात्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विविध पावले उचलली. ज्यामध्ये व्यापारी शिष्टमंडळांची संवाद साधणे त्यांच्या समस्या जाणून घेणे. त्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे. पात्र जीएसटी रिफंड्स मंजूर करून ग्राहकांना वेळेवर खेळते भांडवल त्वरित उपलब्ध करून देणे आदींचा त्यामध्ये समावेश आहे.

देशाच्या आजादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून व्यापार आणि औद्योगिक क्षेत्रातील करदात्यांच्या मदतीसाठी विभागीय कार्यालयासह क्लब रोडवरील जीएसटी भवन येथे सुविधा केंद्रही निर्माण करण्यात आले आहे. बेळगाव सीजीएसटी आयुक्तालयातर्फे आज जीएसटीचा पाचव्या वर्धापन दिन साजरा केला जात आहे. यानिमित्त बेळगाव सीजीएसटी आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त सुंदर राजू सागी यांनी उपरोक्त माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.