Thursday, April 25, 2024

/

..अन् विमान प्रवाशांवर आली बसला धक्का मारण्याची वेळ

 belgaum

विमान प्रवाशांच्या गैरसोय दूर करण्यासाठी वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळातर्फे ‘एअर टू रेल अँड रेल टू एअर इन बस’ या खास बसची सोय करण्यात आली असली तरी अवघ्या पाच दिवसात तिने आपले प्रताप दाखविण्यास सुरुवात केली आहे. अचानक बिघाड निर्माण होऊन बंद पडल्यामुळे ती सुरू करण्यासाठी बसला धक्का मारण्याची वेळ वाहकासह विमान प्रवाशांवर आल्याची घटना आज मंगळवारी घडली

बेळगाव विमानतळ प्राधिकरणाच्या सहकार्याने वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळातर्फे ‘एअर टू रेल अँड रेल टू एअर इन बस’ या मध्यवर्ती बसस्थानक मार्गे बेळगाव विमानतळ ते बेळगाव रेल्वे स्थानक अशा या बस सेवेचा शुभारंभ नुकताच गेल्या 2 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.

या बस सेवेसाठी देश-विदेशातून विमानाने बेळगावात येणाऱ्याला प्रवाशांना प्रशस्त वाटावी अशी नवी बस रंगरंगोटी करून तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार गेले पाच दिवस सुरळीतपणे सेवा बजावत असलेली ही प्रशस्त बस आज मंगळवारी अचानक बंद पडली.Bus ksrtc

 belgaum

विमानतळाच्या आगमन प्रवेशद्वाराशेजारी (अराईव्हल गेट) उभी असलेली बसगाडी चालकाकडून वारंवार प्रयत्न करूनही सुरू होत नसल्यामुळे लवकरात लवकर आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यास उत्सुक असलेल्या विमान प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. अखेर बस सुरू करण्यासाठी बस वाहकासह प्रवाशांना बसला वारंवार धक्का मारावा लागला. या काळात इतर प्रवाशांवर मात्र बस केव्हा सुरू होते? याची प्रतीक्षा करत ताटकळत थांबण्याची वेळ आली होती.

सदर प्रकाराबद्दल वायव्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विमान प्रवाशांमध्ये तर नाराजी व्यक्त होतच होती. त्याखेरीज परगावाहून आलेल्या आपल्या नातलगांच्या स्वागतास आलेल्या स्थानिक नागरिकांमध्ये देखील तीव्र नापसंती व्यक्त होत होती. खरेतर हवाईमार्गे येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी उत्तम दर्जाच्या बस गाडीची सोय असायला हवी.

मात्र आजचा प्रकार पाहता सध्या बेळगाव विमानतळावर कार्यरत असलेली बस नेमक्या कोणत्या दर्जाची आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे किमान देश-विदेशातून हवाईमार्गे बेळगावात येणाऱ्या पाहुण्या प्रवाशांसमोर तरी अशाप्रकारे आपल्या शहराची नाचक्की होऊ नये याची दक्षता घेतली गेली पाहिजे, अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.