नेहमीप्रमाणे घरासमोर पार्क केलेली महागडी मोटर सायकल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नुकतीच आगरकर रोड, टिळकवाडी येथे घडली आहे.
याप्रकरणी आदित्य दीपक वेर्णेकर यांच्या फिर्यादीनुसार टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वेर्णेकर यांनी नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री घरासमोर आपली 3.50 लाख रुपये किमतीची केटीएम ड्युक मोटरसायकल नेहमीप्रमाणे उभी केली होती.
मात्र चोरट्यांनी ही महागडी मोटरसायकल शिताफीने लांबविल्याची घटना गेल्या रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर वेर्णेकर कुटुंबीयांनी शोधाशोध करून अखेर टिळकवाडी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास चालविला आहे. गेल्या कांही दिवसांपासून ठळकवाडी परिसरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी केली जात आहे.