हरिहर चाळ, गजानन रोड, टिळकवाडी येथील रहिवासी मराठा बँकेचे माजी शाखा व्यवस्थापक अशोक यल्लाप्पा जैनोजी व सौ. अंजली अशोक जैनोजी यांचे चिरंजीव अमेय अशोक जैनोजी यांना वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन पदी बढती मिळाली आहे.
अमेय जैनोजी हे एनवायके (निप्पाॅन युसेन कुबुशिकी कैशा शिप मॅनेजमेंट प्रा. लि.) या कंपनीची सेवा बजावत आहेत. त्यांचे बेळगावातील शालेय शिक्षण सेंट झेवियर्स हायस्कूल आणि महाविद्यालयीन शिक्षण जीएसएस कॉलेज येथे झाले आहे.
आपले पुढील शिक्षण त्यांनी तोलानी मरीटाइम्स पुणे येथे पूर्ण केले. गेल्या 2010 साली ते एनवायके या कंपनीत नोकरीला लागले. त्यानंतर 2012 मध्ये थर्ड इंजिनियर ऑफिसर आणि 2014 साली सेकंड ऑफिसर झाले. पुढे 2017 साली चीफ ऑफिसर व जून 2022 मध्ये त्यांना आता कॅप्टन पदी बढती मिळाली आहे.
जगभरात केवळ तीन स्पेशल शीप असलेल्या एका शिपवर अर्थात जहाजावर सध्या ते कॅप्टन म्हणून काम पहात आहेत. मधुकर राव येळ्ळूरकर यांचे ते जावई आहेत.
लहान वयात म्हणजे वयाच्या 33 व्या वर्षी अमेय जैनोजी यांनी मिळवलेल्या या उत्तुंग यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.