Monday, January 13, 2025

/

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

 belgaum

जमिनी संदर्भात तहसीलदार कार्यालयाकडून आलेल्या अर्जाची पूर्तता करण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चिंचली (ता. रायबाग) येथील तलाठ्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचून रंगेहात पकडले.

जगदीश कित्तूर असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे गणकोडी तोट शिरगूर रस्ता, चिंचली येथील सचिन शांतिनाथ उर्फ शांतू शिंदे यांच्या फिर्यादीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी अधिकाऱ्यांनी उपरोक्त कारवाई केली.

सचिन शिंदे यांच्या जमिनीसंदर्भात रायबाग तहसीलदार कचेरीतुन एक अर्ज आला होता. सदर अर्जावर शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्याची पूर्तता करण्यासाठी चिंचलीचे तलाठी जगदीश कित्तूर यांनी 5 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत सचिन शिंदे यांनी बेळगाव एसीबी पोलिस ठाण्यात हजर होऊन तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीची दखल घेऊन आज बुधवारी आपल्या कार्यालयात लाच स्वीकारत असताना जगदीश कित्तूर याला एसीबी अधिकार्‍यांच्या पथकाने रंगेहात पकडले. तसेच त्याच्यावर गुन्हा नोंदवून रक्कम जप्त केली.

एसीबीचे बेळगाव उत्तर वलय पोलीस अधीक्षक बी. एस. नेमगौडा आणि उपाधिक्षक जे. एम. करूनाकर शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक निरंजन पाटील यांच्या नेतृत्वाखालील बेळगाव एसीबी पोलीस कर्मचाऱ्यांनी उपरोक्त कारवाई केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.