Sunday, December 22, 2024

/

हिडकल डॅम येथे वृंदावन गार्डनप्रमाणे उद्यान : कत्ती

 belgaum

हुक्केरी तालुक्यातील हिडिकल डॅम अर्थात राजा लखमगौडा जलाशय परिसरात वृंदावन गार्डनच्या धर्तीवर उद्यानाची निर्मिती करून पर्यटन केंद्र बनविले जाईल, अशी माहिती वन तसेच अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी दिली.

जिना राळ ते हिडकल जलाशयात पर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याच्या योजनेतून केले जात आहे या कामाचे आज आज गुरुवारी भूमिपूजन केल्यानंतर मंत्री कत्ती पत्रकारांशी बोलत होते. हिडकल जलाशयात परिसरात बंगलोरच्या वृंदावन गार्डन च्या धर्तीवर सुंदर अशा उद्यानाची निर्मिती केली जात आहे.

त्या अनुषंगाने पर्यटकांच्या सोयीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून राज्य महामार्गाची दुरुस्ती करण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना स्थानिक नेते बसवराज मटगार यांनी मंत्री उमेश कत्ती यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हिडकल येथील राजा लखमगौडा जलाशय परिसराचा विकास करून उद्यान याची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे हा भाग पर्यटन स्थळ बनेल आणि या भागात व्यापार-उदीम, तसेच आर्थिक उलाढालीला वेग येईल. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, असे सांगितले.

याप्रसंगी भाजप नेते परगौडा पाटील सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता गिरीश देसाई, प्रभाकर कामत, ठेकेदार शिवकुमार मटगार, श्रीधर कबाडगी, करुणा शेट्टी, कल्लाप्पा तळवार, एम. एम. मुल्ला आजरेकर आदी उपस्थित होत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.