मंगळवार बुधवार आणि गुरुवार रमजान बसवेश्वर जयंती आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात तीन दिवस कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरील तिन्ही सणानिमित्त बेळगाव शहरांमध्ये भव्य आणि दिव्य शिवजयंती मिरवणूक बसवेश्वर जयंती मिरवणूक आणि ठिकाणी होणाऱ्या पूजा आणि रमजान सणानिमित्त होणाऱ्या प्रार्थनेच्या पार्श्वभूमीवर आगामी तीन दिवस बेळगाव शहर परिसराचा मध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील इतर भागांतून ही पोलीस कुमक मागवण्यात आली असून बेळगावच्या शिवजयंतीच्या चित्ररथ मिरवणुकीसाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बेळगाव शहरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती चित्ररथ मिरवणूक या दोन मोठ्या सणांमध्ये पोलिस बंदोबस्त असतो राज्यातील पोलीस दलाचे देखील याकडे लक्ष असते आणि बेळगाव पोलिसांची या वेळी मोठी कसरत करावी लागते त्यामुळे पोलिसांपुढे मिरवणूक यशस्वी करणे हे आवाहन असते. नेहमीप्रमाणे राज्यातील इतर भागातून देखील शिवजयंती मिरवणुकीसाठी पोलीस दलातून अधिकारी बंदोबस्तासाठी दाखल झालेले आहेत.
आगामी तीन दिवसांसाठी बेळगाव शहरात एक पोलिस आयुक्त तीन डीसीपी,16 डी एस पी, 44 पोलीस निरीक्षक,62 पी एस आय,144 ए एस आय आणि 2000 पोलीस कर्मचारी,600 होम गार्ड, के एस आर पी च्या बारा आणि सी ए आर दहा तुकड्या,राज्य गुप्तचर खाते,आंतरिक सुरक्षा विभाग आदी तैनात करण्यात आले आहे.
कमी तीन दिवसांमध्ये मिरवणुकी सह इतर घडामोडीवर नजर ठेवण्यासाठी पोलीस खात्याकडून ड्रोन कॅमेरा देखील वापर केला जाणार आहे त्याच्यामुळे ड्रोन कॅमेरा चा तिसरा डोळा याची नजर बेळगाव वर असणार आहे.विशेष पोलीस बंदोबस्तात सहा रहदारीच्या मार्गात देखील बदल करण्यात आलेले आहेत त्यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहन पोलिस खात्याने केले आहे
दरम्यान सोमवारी सायंकाळी पोलिस आयुक्त डॉ एम बी बोर्लिंगय्या, डी सी पी रविंद्र गडादी, आमदार अनिल बेनके मनपा आयुक्त रुड्रेश घाळी हेस्कॉम अधिकारी आणि शिवजयंती चित्रवत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवजयंती मिरवणूक मार्गाची पाहणी केली.
सोमवारी शिवजयंती चित्ररथ महामंडळ आणि आमदार अनिल बेनके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चित्ररथ मिरवणुकीतील अडथळे दूर करण्याची मागणी कशा पद्धतीने पोलिस बंदोबस्त केला जाईल रात्रीच्यावेळी याच्या सूचना केल्या गणपत गल्ली मारुती गल्ली आदी परिसरामध्ये निवडणूक मार्गाची पहाणी करण्यात आली.