Thursday, April 25, 2024

/

मराठा जागृती संघ भाषण स्पर्धेतील विजेते

 belgaum

मराठा जागृती निर्माण संघाच्यावतीने आयोजित खास शिवजयंतीनिमित्त भाषण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास पस्तीस स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

1 मे रोजी युगपुरुष ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर आधारित पाच ते सात मिनिटांसाठी ही भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून किरण पाटील श्रीपतराव पाटील आणि संभाजी स्कूल बैलुर चे मुख्याध्यापक एस जी पाटील यांनी काम पाहिले होते.

स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे आहेत 11 ते 13 वयोगट
प्रथम क्रमांक सई शिवाजी शिंदे,सरोज शिवाजी शिंदे,वेदांत नरेंद्र बिरजे,
14 ते 16 वयोगट:वृंदा परशराम पाटील वाघवडे,वैभवी विलास नलवडे हिंडलगा,प्रज्ञा शिवराम देसाई,

 belgaum

Speech prize
17 वर्षा वरील विजेते:भूमी रमेश भोसले,श्वेता राजू कणबरकर,वर्धा पाटील मच्छे यांनी यश मिळवले असुन विजेत्यांना रोख रक्कम स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले.11 ते 13 वयोगटातील प्रत्येक स्पर्धकाला रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळराव बिरजे होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संगीत रत्न शंकर पाटील, सिद्धांत पाटील, भरत बाळेकुंद्री वर्षा बिरजे, गोपी बाळेकुंद्री आदींनी विशेष परिश्रम घेतले. प्रदीप बिरजे यांनी सूत्रसंचालन केले तर सोनाली बिर्जे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.