केएलई विद्यापीठ, कर्नाटक राज्य जलतरण संघटना (केएसए) आणि स्थानिक स्विमर्स क्लब बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत एनआरजे केएलई विद्यापीठ राज्यस्तरीय उपकनिष्ठ आणि कनिष्ठ जलतरण अजिंक्यपद -2022 या स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून स्पर्धेचा दुसरा दिवस डॉल्फिन ॲक्वेटिक व बसवणगुडी ॲक्वेटिक सेंटर बेंगलोरच्या जलतरणपटूंनी गाजवत वर्चस्व राखले.
सुवर्ण जे एन एम सी जलतरण तलावामध्ये आयोजित सदर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या केएलई विद्यापीठाचे आणि उपकुलगुरू डॉ. विवेक सावजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून करण्यात आले. याप्रसंगी केएलई विद्यापीठाचे निबंधक डॉ. व्ही. ए. कोठीवाले, स्पर्धा समन्वयक उमेश कलघटगी, गोपाळ होसुर, डाॅ. रक्षित जगदाळे, सतीश कुमार, इंद्रजीत हलगेकर, सुधीर कुसाणे आदी उपस्थित होते.
या राज्यस्तरीय स्पर्धेतील काल दुसऱ्या दिवशी झालेल्या विविध शर्यतींपैकी कांही शर्यतींमधील पहिल्या तीन क्रमांकाचे विजेते पुढीलप्रमाणे आहेत. 800 मी. फ्रीस्टाइल (मुले) -पवन धनंजया बसवणगुडी, अमोघ आनंद व्यंकटेश बसवणगुडी, धनेश एन. विजयनगर ॲक्वेटिक. मुली -शिरिन बसवणगुडी, आदिती एन. मुलिया बसवणगुडी, रक्षिता बी. एम. बसवणगुडी. 4×200 मी. फ्री स्टाईल (मुले) -बीएससी अ, डॉल्फिन ए, डॉल्फिन बी. मुली -डॉल्फिन ए, बीएससी अ, डॉल्फिन बी.
200 मी फ्रीस्टाइल (मुले) -शरण श्रीधरा मस्त्या इंक, जास सिंग मत्स्या, अरव जे. पूजा ॲक्वेटिक सेंटर. मुली -अलिशा स्वीदल रेगो डॉल्फिन ॲक्वेटिक, त्रिशा सिध्दू एस. डीकेव्ही ॲक्वेटिक, तन्वी गुरव विजयनगर ॲक्वेटिक. 100 मी ब्रेस्ट स्ट्रोक (मुले) -विदीत शंकर डॉल्फिन, शुभांग कुबेर बसवणगुडी, आदित्य स्मरण ओलेटी बसवणगुडी, मुली -शानवी एस. राव ग्लोबल, एस. लक्षा बसवणगुडी, लिनेशा अनिलकुमार ग्लोबल.
100 मी. ब्रेस्ट स्ट्रोक (मुले) -आर नवनीतगौडा डॉल्फिन, दक्ष मत्ता बसवणगुडी, डॅनियल पाॅल जे. डॉल्फिन. मुली -मानवी वर्मा डॉल्फिन, नयना बसवणगुडी, रियाना फर्नांडिस डॉल्फिन. 50 मी. बॅकस्ट्रोक (मुले) -उत्कर्ष संतोष पाटील बसवणगुडी, नयन विघ्नेश पी. नेता कल्लाप्पा ॲक्वेटिक, आकाश मणी बसवणगुडी. मुली -रिधिमा वीरेंद्रकुमार बसवणगुडी, शालिनी आर. दीक्षित डॉल्फिन, रितू भरमराडी बसवणगुडी. 50 मी. बॅकस्ट्रोक (मुले) -ईशान मेहरा डॉल्फिन, कुशल के. बसवणगुडी, अमन सुनगार स्विमर्स क्लब बेळगाव. मुली -सिद्धी शहा डॉल्फिन, प्रियांशी मिश्रा गफ्राय स्विमिंग, नक्षत्रा गौतम बसवणागुडी.
100 मी. बटरफ्लाय (मुले) -अर्जुन राघवन डॉल्फिन, अथर्व पाल सिंग राठोड डॉल्फिन, एस. क्रिश बसवणागुडी. मुली -अलिशा स्वीडल रिगो डॉल्फिन, जानवी व्यंकटेश्वरा परूमल डॉल्फिन, व्दीशा शेट्टी डॉल्फिन. 200 मी बटरफ्लाय (मुले) -उत्कर्ष संतोष पाटील बसवणगुडी, कार्तिकेयन नायर डॉल्फिन, नयन विघ्नेश नेता कल्लाप्पा ॲक्वेटिक. मुली -ए. जेडीदा डीकेबी ॲक्वेटिक, रितिका बी. एम. बसवणगुडी, अन्वेशा गिरीश डॉल्फिन. 200 मी बटरफ्लाय (मुले) -तरुण कार्तिकेयन डॉल्फिन, हरी कार्तिक वेलू गोल्डन, अक्षज टकुरिया डॉल्फिन. मुली -हसिका रामचंद्रा डॉल्फिन, तनिषी गुप्ता डॉल्फिन, तनिशा विनय बसवणगुडी.
4×100 मी. फ्री स्टाइल रिले (मुले) -बीएससी अ बसवणागुडी, टीम ए डॉल्फिन, बीएससी ब बसवणागुडी. यासह अन्य जलतरण शर्यती स्पर्धेच्या कालच्या दुसऱ्या दिवशी घेण्यात आल्या. या शर्यतींमधील यशस्वी जलतरणपटूंना मान्यवरांच्या हस्ते चषक, पदके, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.