Monday, April 29, 2024

/

शहराची स्मार्टच्या दिशेने वाटचाल- माय बेळगाव एप्

 belgaum

बेळगाव शहर स्मार्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून घरबसल्या शासनाच्या अनेक सुविधा जनतेला उपलब्ध होणार आहेत.’माय बेळगाव’ या एपच्या माध्यमातून रुग्णवाहिका सेवा,प्रवासाची माहिती,बस सेवेची माहिती,घरात बसल्या बसचे लाईव्ह लोकेशन माहिती करवून घेणे यासह सर्व जिल्हा स्तरीय सरकारची कार्यालयात जनतेला या अप्पच्या माध्यमातून तक्रारी केल्या जाऊ शकतात अशी माहिती स्मार्ट सिटीचे एम डी प्रवीण बागेवाडी यांनी दिली.

बेळगाव शहरातील विश्वेश्वरय्या नगर येथील इंटिग्रेटेड कमांड सेंटर मध्ये माय बेळगावी अप्प जनतेच्या सेवेत बहाल केल्यावर ते बोलत होते.बेळगाव शहरातील1 लाख10 हजार घरांना आर एस आय डी टॅग लावण्यात आला आहे त्यावर दररोज कचरा गोळा करणाऱ्या वाहनांवर नजर ठेवली जाणार आहे महा पालिका ही यंत्रणा हाताळणार आहे.

राकस्कोप जलाशयातून होणाऱ्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी लक्ष्मी टेक मध्ये बसवण्यात आलेल्या दोन टॅंक मध्ये शुद्धीकरण मापन कार्यान्वित केले जाते पिण्याच्या पाण्याच्या दर्जावर देखील निगा ठेवली जाणार आहे.

 belgaum

शहरात चालणाऱ्या रुग्णवाहिकांच्या सेवेत देखील माय बेळगाव अप्पची मदत लाभणार आहे या द्वारे अंबुलन्स चे live लोकेशन शोधून थेट अंबुलन्स चालकाला संपर्क होणार आहे यामुळे जनतेला रुग्णवाहिका सेवा तात्काळ उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी नमूद केलं.Intigreted command centre

शहरातील ब्लॅक स्पॉट वर नजर

संपूर्ण शहरात कचरा आणि प्लास्टिकच्या वस्तूंना बंदी आहे.कॅमेऱ्याने शहरातील ब्लॅक स्पॉट्सचे निरीक्षण केले जाणार असून कचरा फेकणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.मनपा आयुक्त रुद्रेश घाळी म्हणाले की, शहरातील स्वच्छतेबाबत सर्व दुकान मालकांनायाबाबत सूचित केले पाहिजे.वाहतूक सिग्नल: शहरात एकूण 20 वाहतूक सिग्नल, 16 नवीन सिग्नल आणि 4 जुने वाहतूक सिग्नल आहेत त्यांना कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

बसेससाठी जीपीएस सोय : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकापासून 108 वाहतूक मार्ग आहेत. त्यात 62 बसेस ना जी पी एस बसवण्यात आले आहे तरत्यातील 48 जीपीएस कार्यरत असल्याचे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

आग आपत्ती व्यवस्थापन; शहराची वाढ झपाट्याने होत आहे, आग लागल्यास आपत्कालीन 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी फायर हायड्रंट उपलब्ध करून देण्याची विनंती अग्निशमन दलाने केली आहे.या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी व इंटिग्रेटेड कमांड सेंटरमध्ये कार्यरत कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.