Friday, December 27, 2024

/

शरद पवार यांचा दोन दिवसीय बेळगाव दौरा सुरू

 belgaum

माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी दुपारी उद्योगपती कै. अरविंद गोगटे यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केलं.

मागील काही महिन्यापूर्वी अरविंद गोगटे यांचं निधन झालं होतं त्यानंतर पवार हे पहिल्यांदाच बेळगावला आले होते त्यांनी त्यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबियांशी सांत्वन चर्चा केली.पवार यांच्या बेळगाव दौऱ्यात ते गोगटे यांच्या घरी जात असतात.

यावेळी चंदगडच्या आमदार राजेश पाटील बेळगाव भाजपचे विधान परिषद सदस्य महंतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.दरम्यान गोगटे यांच्याच निवासस्थानी पवार यांनी कर्नाटक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची देखील चर्चा केली.Ncp

पवार दुपारी बारा वाजता पवार बेळगावात आले होते गोगटे यांच्या कुटुंबियांना भेट दिल्यानंतर दुपारी दोन च्या दरम्यान ते पुन्हा चिकोडी अंकली येथे कार्यक्रमाला रवाना झाले रात्री मंगळ रात्री परत ते मुक्कामाला बेळगावला आले आहेत.

बुधवारी सकाळी ते बेळगाव शहरांमधील दोन कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. बुधवारी सकाळी आठ वाजता मराठा को ऑप बँकेच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यानंतर अकरा वाजता दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी सांगता कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.