Tuesday, April 23, 2024

/

निपाणीत हेलिकॉप्टरमधून शिवमुर्तीवर पुष्पवृष्टी

 belgaum

निपाणी (जि. बेळगाव) येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे यावर्षी भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येणार असून विशेष म्हणजे शिवजयंतीनिमित्त यंदा प्रथमच सोमवारी शिवमूर्तीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे यावर्षी भव्य प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.Nipani shivaji maharaj

शिवमुर्तीवर माजी आमदार काकासाहेब पाटील आणि माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या उपस्थितीत आमदार सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

 belgaum

तत्पूर्वी श्रीमंत दादाराजे देसाई निपाणीकर सरकार यांच्या हस्ते शिवमुर्ती अभिषेक होईल. यावेळी जिजामाता महिला मंडळाकडून पाळणा सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर आकाशातून पुष्पवृष्टी करण्याचा कार्यक्रम होणार असल्याचे माहिती स्वराज्यरक्षक प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.