Wednesday, November 20, 2024

/

नानावडीत धाडसी चोरी-लाखोंचा ऐवज लंपास

 belgaum

घरात कोणीही नसलेला पाहून लाखो रुपयांचा ऐवज लंपास करत धाडसी चोरी केल्याची घटना बेळगाव शहरातल्या नाना वाडी भागात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. नानावडी येथील अभियंता असलेल्या सुरज मासेकर यांच्या घरात ही चोरी झालेली आहे.

जवळपास अर्धा किलो सोने, एक किलो चांदी आणि पन्नास हजार रुपये रोकड असा अंदाजे 25 लाखाचा ऐवज चोरट्यानी लंपास केला आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज हे अभियंता आहेत आणि ते गुरुवारी खानापूर येथे नातलगांच्या घरी पुण्यतिथी कार्यक्रमासाठी गेले होते त्यामुळे घराला कुलूप लावण्यात आला होता याचाच फायदा उठवत चोरट्यानी कुलूप तोडून घरात प्रवेश करत डल्ला मारला आहे लाखोंचा मुद्देमाल चोरी केला आहे.

गुरुवारी मासेकर परगावी गेले असता शुक्रवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान घरमालकांनी घरचा दरवाजा उघडा बघितला आणि याची कल्पना पोलिसांना दिली त्यानंतर ही घटना उघडकीस आली.Police logo

दरम्यान घटनास्थळी प्रधान यांनी गुन्हे विभागाच्या डीसीपी स्नेहा आणि टिळकवाडी पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

बेळगाव शहर परिसरात भुरट्या चोऱ्या वाढल्या आहेत नाना वाडीची मोठी चोरीची घटना आहे अश्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी यासाठी रात्रीची गस्त वाढवणे गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.