बेळगाव शहरातील नेहरूनगर येथील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेचा यंदाचा दहावी परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून शाळेतील 11 विद्यार्थी-विद्यार्थिनी विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाले आहेत.
यंदाच्या दहावीच्या परीक्षेत माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील प्रतीक बी.तुरमुरी याने 625 पैकी 583 (93.28 टक्के) गुण संपादन करून शाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याचप्रमाणे रमजान जी. देगीनाळ 625 पैकी 570 (91.20 टक्के) आणि कु. वैष्णवी आर. पाटील 625 पैकी 569 (91.04 टक्के) गुणांसह शाळेत अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला आहे. माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील एकूण 20 विद्यार्थी -विद्यार्थिनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेला बसले होते. यापैकी 11 विद्यार्थी-विद्यार्थिनी विशेष गुणवत्तेत तर 9 विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
सदर यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बेंबळगी, चिटणीस प्रभाकर नागरमुन्नोळी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गावडे, वर्गशिक्षक एस. एस. दोडमनी तसेच अन्य शिक्षक व शिक्षकेतर वर्गाने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. उपरोक्त विद्यार्थ्यांसाठी परीक्षेवेळी वनिता विद्यालय शाळेतील इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी लेखनिक म्हणून सहकार्य केले होते. याबद्दल वनिता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शालिनी हुदली यांचेही आभार मानण्यात आले आहेत.
नवनीत नितीन अवर्सेकर या शाळेत प्रथम
कॅम्प येथील सेंट पॉल हायस्कूलचा विद्यार्थी नवनीत नितीन अवर्सेकर याने यंदाच्या एसएसएलसी परीक्षेत विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण होण्यासह शाळेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
नवनीत अवर्सेकर याने आज जाहीर झालेल्या राज्यातील दहावी अर्थात एसएसएलसी परीक्षेत 97.6 टक्के गुण संपादन केले आहेत. त्याला सदर परीक्षेत 625 पैकी 610 गुण मिळाले असून या पद्धतीने सर्वाधिक गुणांसह तो शाळेमध्ये प्रथम आला आहे. नवनीत हा उद्यमबाग येथील उद्योजक आणि राणी चन्नम्मानगर येथील प्रतिष्ठित नागरिक नितीन अवर्सेकर यांचा मुलगा तसेच शहरातील व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते दीपक अवर्सेकर यांचा पुतण्या आहे. उपरोक्त यशाबद्दल नवनीत अवर्सेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
येळ्ळूरच्या कन्येचे एस एस एल सी परीक्षेत यश
बेळगांव : मिलाग्रिस इंग्रजी माध्यमिक विद्यालय हल्याळ, ता हल्याळ येथील विद्यार्थिनी कु. गौरी रावजी पाटील या विद्यार्थिनी ने 99.04 ट्टके ( गुण – 625 पैकी 619 मार्क ) घेऊन उत्तीर्ण होऊन उत्तर कन्नड जिल्हा तालुका हल्याळ येथे घवघवीत यश मिळविले आहे.
गौरी रावजी पाटील ही बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावची रहिवासी असून अभियंता आणि सामाजिक कार्यकर्ते रावजी पाटील व भारती पाटील यांची कन्या आहे. प्राचार्या अनुप्रिया मॅडम , प्राचार्य विशाल करंबळकर सर आणि सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशामुळे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दहावी परीक्षेत संत मीरा शाळेत रंजिता रमेश शेठ अव्वल.
अनगोळ मधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या दहावीच्या परीक्षा निकालात शाळेची विद्यार्थिनी रंजीता रमेश शेठ आणि 625 पैकी 622 गुण 99.52% घेत शाळेत अव्वल ठरली आहे.
शिवप्रसाद बसवराज गौडा याने 621 गुण 99.04 %टक्के घेत दुसरा, दर्शन बसवनगौडा पाटील 616 गुण 98.56% तिसरा, आकाश आनंद गुंजीककर 611गुण 97.75% टक्के घेत चौथा, पद्मश्री सुरेश बैलूर 602 गुण 96.32% टक्के घेत पाचवा, किर्तिका शंकरगौडा ईरकल 599 गुण 95.84% घेत सहावा, अमृता विठ्ठल उळवी 597 गुण 95 .52 %सातवी,वीरेश संगमेश अंगडी 594 गुण 95.04 %टक्के आठवा , ध्रुव मोहन कलखांब 593 गुण 94.88 % नववा, संचिता दिपक निलजकर 592 गुण 94.72% टक्के घेत शाळेत दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेला शाळेतून 187 विद्यार्थी बसले होते त्यापैकी विशेष प्राविण्य 47,फर्स्ट क्लास 93, सेकंड क्लास 21, एकूण शाळेचा निकाल 86.60% टक्के लागला आहे.
मुक्ता नितीन देसाई सेंट मेरीज मध्ये प्रथम
दहावी परीक्षेत सेंट मेरीज हायस्कूल मध्ये मुक्ता नितीन देसाई ही विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. 625 पैकी 619 गुण घेऊन दहावीत उत्तीर्ण होत सेंट मेरीज स्कूल मध्ये प्रथम येण्याचा बहुमान तिने मिळवला आहे. बेळगाव येथील एम बी देसाई अँड सन्स संस्थेचे संचालक नितीन देसाई यांची ती कन्या आहे.