Monday, December 30, 2024

/

आता दळण झाले प्रतिकिलो 6 रुपये!

 belgaum

वीज दरवाढ आणि गिरणीचे सुटे भाग यांची दरवाढ झाल्याकारणाने सर्वसामान्य दळणाच्या दरा प्रति किलो 6 रुपये वाढ करण्यात आली असल्याचे पीठ गिरणी मालक व चालक संघटनेतर्फे कळविण्यात आले आहे.

अनगोळ, भाग्यनगर, चन्नम्मानगर, टिळकवाडी, नानावाडी, भवानीनगर, पार्वतीनगर, हिंदूनगर व आयोध्यानगर या ठिकाणच्या पिठाच्या गिरणी मालक व चालक संघटनेतर्फे दळणाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

वीज दरवाढ आणि गिरणीचा सुट्या भागांच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्य दळणाचा दर वाढविण्यात आला असून तो आता प्रतिकिलो 6 रुपये इतका करण्यात आला आहे. या सर्वसामान्य दरवाढी बरोबरच विशेष दळणाचे दर यापुढे पुढील प्रमाणे असणार आहेत.

मेतकूट : प्रति किलो 10 रुपये, मका : प्रति किलो 10 रु., मिरची दळप : प्रति किलो 20 रु., मिरची कांडप : प्रति किलो 25 रु., भात कांडप : प्रति पोते 50 रु., भात कांडप : प्रति डबा 10 रुपये.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.