गेल्या छत्तीस वर्षांपासून लोकसेवेचे व्रत घेऊन समाजजीवनात काम करणाऱ्या बेळगावच्या जायंट्स मेन या संघटनेला त्यांच्या सेवाकार्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे जायंट्सचे आंतरराष्ट्रीय परिषद झाली न्हवती यावर्षीची परिषद ही दमन सारख्या केंद्रशासित प्रदेशात झाली.तीन दिवस चाललेल्या परिषदेत जायंट्सच्या संघटनांनी कोणत्या पद्धतीने काम करावे या सांगण्याबरोबरच उत्कृष्ट काम केलेल्या प्रत्येकाचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिव दमन या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल पटेल आणि खासदार बाबूभाई पटेल होते तर अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय अध्यक्षा शायना एन सी होत्या.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचा हस्ते वरील पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वैयक्तिक पातळीवर आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम उपाध्यक्ष म्हणून सुनिल मुतगेकर यांना सलग दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाला तर फेडरेशन सचिव अनंत लाड यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.विशेष समिती सदस्य मोहन कारेकर यांनाही स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच ज्योती अनगोळकर यांनाही सलग दुसऱ्यांदा उत्कृष्ट माजी अध्यक्ष म्हणून प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.या तिघांचेही शायना एन सी यांनी जायंट्स मेनच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.
या तिघांच्यावर बेळगाव परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहेया अधिवेशनात संपूर्ण देशाबरोबरच आंतरराष्ट्रीय संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.