Wednesday, December 4, 2024

/

रद्दीचे कागद द्या, मी शैक्षणिक शुल्क देईन : माजी महापौर मोरे

 belgaum

बेळगाव शहरातील विद्या आधार एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटीच्यावतीने समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काचे वाटप करण्याचा कार्यक्रम आज सोमवारी उत्साहात पार पडला.

भरतेश कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना शांताई वृद्धाश्रमाचे (दुसरे बालपण) कार्याध्यक्ष व बेळगावचे माजी महापौर विजय मोरे यांनी विद्यार्थ्यांनी मला रद्दीचे कागद द्यावेत मी त्यांना विद्या आधार योजनेतून शैक्षणिक शुल्क देईन असे सांगितले. या कार्यक्रमास भरतेश शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य विनोद दोड्डण्णावर आणि भरतेश महाविद्यालयाच्या प्राचार्या सुनीता देशपांडे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

तसेच विद्या आधार एज्युकेशन अँड रुरल डेव्हलपमेंट सोसायटीचे संचालक विनायक लोकूर, विजय मोरे, संतोष ममदापूर, ॲलन मोरे आणि संतोष दरेकर हे व्यासपीठावर हजर होते.Vidhya aadhar

सदर कार्यक्रमात पुढील चार विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कासाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले : यश खोत भाऊराव काकतकर कॉलेज – 10,000 रु., खुशी विजय मोहिते वनिता विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल – 5000 रु., प्रेम विजय मोहिते वनिता विद्यालय इंग्लिश मीडियम स्कूल – 5000 रु., आणि धनश्री भागानगरे भाऊराव काकतकर कॉलेज – 9000 रुपये. यावेळी बोलताना विनायक लोकूर यांनी या चळवळीत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी घरातील वापरलेली वृत्तपत्रे देऊन गरजू विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत करावी असे आवाहन केले.

विनोद दोड्डण्णावर यांनी या चळवळीचे कौतुक केले, त्यांनी आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना सहभागी होऊन विद्या आधार योजना मजबूत करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास भरतेश महाविद्यालयाचे शिक्षक कर्मचारी नीता नाईक, भारती हलसगी, सूरज सुतार आदींसह हितचिंतक व पालक वर्ग उपस्थित होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.