Monday, February 3, 2025

/

भाई दाजिबा देसाई यांनी याच विचाराने सीमाभागात शिक्षण प्रसाराचे काम: शरद पवार

 belgaum

भाई दाजिबा देसाई यांनी याच विचाराने सीमाभागात शिक्षण प्रसाराचे काम केले. या प्रबोधनाच्या कामात संस्थेला महाराष्ट्र आणि कर्नाटकाकडून अनुदान कमी पडणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतो, अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री, खासदार शरद पवार यांनी दिली.

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा सुवर्ण महोत्सव सांगता आणि साप्ताहिक राष्ट्रवीरचा शताब्दी महोत्सव कार्यक्रम बुधवारी (दि. 11) सकाळी ज्योती महाविद्यालयाच्या आवारात पार पडला. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सरोज पाटील होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री पवार बोलत होते.

ते म्हणाले की भाई दाजिबा देसाई यांनी याच विचाराने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संस्था सुरू केली. एन. डी. पाटील यांच्यासारख्या ध्येयवादी नेत्याने संस्थेचा विस्तार केला. संस्थेकडून समाज प्रबोधनाने काम अखंडपणे सुरू आहे. त्यामुळे या संस्थेला महाराष्ट्र मी अनुदान कमी पडू देणार नाही. माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे यांनी कर्नाटकाकडून अनुदान कमी पडू नये, याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी साप्ताहि राष्ट्रवीरचेही कौतुक केले.Sharad pawar speech

 belgaum

सामाजिक बदलांसाठी शाहू, फुले, आंबेडकर यांचे योगदान महत्वाचे ठरले आहे. शाहू महाराजांनी समाजातील चुकीच्या प्रथा दूर केल्या. अंधश्रध्देवर प्रहार केले. महात्मा फुले दांपत्याने कष्टकर्‍यांच्या कर्तत्वावर विश्वास दर्शवला. बहुजन समाजाने उन्नती साधावी यासाठी उभं आयुष्य खर्ची घातले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मजबूत संविधान दिले. आज श्रीलंकेचा राष्ट्राध्यक्ष पलायन करतोय, पाकिस्तानच्या पंतप्रधानाला पायउतार व्हावे लागते. गेल्या सत्तर वर्षात भारतात असा प्रकार घडलेला नाही. त्यामागे मजबूत संविधान आहे. सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंबेडकर यांनी धरण बांधणी, वीज निर्मिती, वीज प्रसरण यासारखे महत्वाचे कार्य केले आहे. समाज, देश फुलवण्यात या तिघांची दृष्टी होती.

उपाध्यक्ष अ‍ॅड. राजाभाऊ पाटील यांनी प्रास्ताविकात, अनेक अडथळ्यांवर मात करून संस्थेने वाटचाल केली आहे. मराठी माणसांच्या लढ्यात शरद पवार यांनी योगदान दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जाण्याच्या आमच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी पुढाकार घ्यावा, असे असे आवाहन केले.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.