पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या केंद्राच्या निर्णयानंतर राज्य सरकार देखील इंधन करात आणखी कपात करण्याचा विचार करेल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत भाग घेण्यासाठी जाण्यापूर्वी बेंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात आणखी गुंतवणूक आकर्षित करण्याचा विश्वास व्यक्त केला. थेट परकीय गुंतवणुकीत कर्नाटक देशात पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या चार तिमाही प्रमाणे या तिमाहीत देखील कर्नाटकात सर्वाधिक एफडीआय आली आहे. अनेक परदेशी आणि भारतीय उद्योग कर्नाटकात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत.
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या जागतिक गुंतवणूकदारांच्या मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास विश्वास आहे. कर्नाटक सरकार केवळ सामंजस्याच्या करारावर स्वाक्षरी करत नाही तर राज्यात उद्योग प्रत्यक्षात यावेत यासाठी सर्व उपाययोजना करणार आहे, असेही मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे जाणाऱ्या शिष्टमंडळात उद्योगमंत्री मुरुगेश निराणी, माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान मंत्री सी. एन. अश्वत नारायण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
तेथे हे शिष्टमंडळ आणि जागतिक नेत्यांना आणि उद्योगपतींना भेटणार आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा हा पहिलाच परदेश दौरा असणार आहे. दरम्यान, इन्व्हेस्टमेंट कर्नाटक 2022 ग्लोबल इनोव्हेटर्स मिटला दावोस मोठी चालना देईल, असे ट्विट देखील मुख्यमंत्र्यांनी केले आहे.