बेळगाव येथील डी वाय चौगुले भरतेश स्कूलच्या 1997 साली दहावी पास झालेल्या मराठी माध्यम विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा कार्यक्रम गेल्या रविवारी तिळकवाडी येथील हॉटेल बॅकबेंचर्स मध्ये संपन्न झाला.
1997 सालचे विद्यार्थी ज्ञानदान केलेले शिक्षक के एल दिवटे, बी एल सायनेकर, विजय परांजपे, ए व्ही चौगुले, अनंत लाड व एम टी चौधरी उपस्थित होते.
मेळाव्याची सुरुवात शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. त्यानंतर क्रांती पाटील हिने प्रास्ताविक केले तर विनायक चौधरी, रूपेश खोत या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा परिचय करून देत असतानाच त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
‘आमच्या जीवनात सरानी केलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग करून घेऊन यशस्वी होणे हीच आमच्या गुरुजनांना दिलेली गुरुवंदना होय’ असे ते म्हणाले .
त्यानंतर या सर्व शिक्षकांना शाल ,पुष्पहार, श्रीफळ, फळांच्या करण्डी व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. गुरुजनांनी विद्यार्थ्यांच्या गुरु वंदनेबद्दल आनंद व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. क्रांती पाटील हिने आभार व्यक्त केले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्नेहभोजन केले. गप्पांचा कार्यक्रम झाला .
कार्यक्रमासाठी बेळगाव, गोवा, गोकाक, पुणे येथून विद्यार्थी आले होते .25 वर्षानंतर झालेला हा मेळावा आनंददायी ठरला