Thursday, December 19, 2024

/

बेळगाव भाजपातील दुफळीला पालकमंत्र्यांचा दुजोरा

 belgaum

जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये दुफळी असूनही आजच्या केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला सर्व नेते उपस्थित होते असे सांगून बेळगाव भाजपमध्ये दुफळीचे राजकारण सुरू असल्याचे बोलले जात असल्याच्या गोष्टीला आज जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी देखील दुजोरा दिला.

बेळगाव भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा असून यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी त्याला दुजोरा दिला. पक्षातील स्थानिक दुफळी ही राजकीय नसून सर्व नेते एकसंध होऊन काम करत आहेत. यासाठीच जारकीहोळी यांच्यासह सर्वच नेते आजच्या बैठकीला उपस्थित होते, असे त्यांनी सांगितले. पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात भाजपचा विजय निश्चित आहे. हणमंत निराणी हे योग्य उमेदवार आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात आपल्या पक्षाचा विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त करताना राज्यात भाजप सरकार विकास कामे करत असून पक्षाला जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सिद्धरामय्या यांनी कर्जमाफीबद्दल केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री म्हणाले, येत्या 2023 साली होणाऱ्या निवडणूकीत पुन्हा भाजपच राज्यात सत्तेवर येणार आहे. देशातील जनतेची काँग्रेसने फसवणूक केली आहे जनतेला तांदूळ नाही तर स्वाभिमानाची आवश्यकता असून आजतागायत खोटेपणाने वागलेले काँग्रेस आता पिछाडीवर गेले आहे. राज्यात अचानक सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थिती संदर्भात प्रतिक्रिया देताना पाऊस येणे ही सर्वसामान्य जनता आणि शेतकरी विशेष करून ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. ज्या शेतकऱ्यांना या पावसामुळे त्रास झाला आहे, अडचणी निर्माण झाल्या आहेत अशा शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

तसेच जिल्हाधिकार्‍यांनी चिक्कोडी येथील बैठकीत देखील सूचना दिल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री यांनी दिली. बेळगावमध्ये आज शनिवारी आयोजित भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना राज्यातील अनेक विषयांवर जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांनी आपले मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.