बेळगाव येथील संकम हॉटेलमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक एकीकडे सुरू असताना दुसरीकडे बुधवारी काँग्रेसचे तीन दिग्गज नेते बुधवारी बेळगावात येणार आहेत.
बेळगाव जवळील हिंडलगा येथील ठेकेदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणाने देश आणि राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. संतोष पाटील यांच्या कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी बुधवारी सायंकाळी काँग्रेसचे प्रभारी रणजीत सुरजेवाला,के पी सी सी अध्यक्ष डी के शिवकुमार आणि विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या हे बेळगावला येणार आहेत.
काँग्रेसचे जेष्ठ नेते केवळ त्या पिडीत कुटुंबाला सांत्वन देणार नसून आत्महत्या केलेल्या त्या ठेकेदाराच्या अंतिम संस्कारा मध्ये देखील सहभागी होण्याची शक्यता काँग्रेस सूत्रांनी वर्तवली आहे. राज्य भरात ठेकेदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणाचे पडसाद उमटत असून या प्रकरणी काल बेळगावात कॉंग्रेस आक्रमक झाली होती आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संकम हॉटेलमध्ये भाजपची कार्यकारिणीची कोअर कमिटी बैठकीच्या हॉटेलला घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता आणि या वेळी हाय व्होल्टेज ड्रामा याठिकाणी रंगला होता.
संतोष पाटील आत्महत्येप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाले असून ग्रामीण विकास मंत्री के एस ईश्वरप्पाया आत्महत्येला जबाबदार आहेत असा आरोप करत त्यांनी ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांना अटक करा अशीही मागणी करत आंदोलन केले होते.
संतोष पाटील या ठेकेदाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत शासकीय कामाचे बिल पास करण्यासाठी ईश्वरप्पा आपल्याकडून 40 टक्के कमिशन मागत असल्याचा आरोप केला होता आणि ईश्वराप्पा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी पत्र लिहून केली केली होती.
त्यानंतर त्याने सुसाईड नोट लिहीत आपल्या आत्महत्येला ईश्वरप्पा जबाबदार असल्याचा आरोप करत काल आत्महत्या केली होती त्यानंतर या संपूर्ण प्रकरणांमध्ये ग्रामीण विकास मंत्री ईश्वराप्पा यांना जबाबदार धरण्यात येत आहे आणि काँग्रेस या प्रकरणी भाजपवर आक्रमक झालेला दिसत आहे.