Saturday, December 28, 2024

/

स्केटिंग स्पर्धेत या खेळाडूंना मिळाले यश

 belgaum

बेळगाव डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनच्यावतीने आयोजित ” रोख पारितोषिक जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 ” या स्पर्धेला स्केटिंगपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केएलई सोसायटी संचलित लिंगराज महाविद्यालयाच्या आवारातील स्केटिंग रिंकवर झालेल्या या स्पर्धेत 260 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता.

येथील श्री शिवाय फाउंडेशन ग्रुप आणि इफिशियंट ग्रुप बेलगाम यांच्यावतीने ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्या स्केटिंगपटूंना प्रमाणपत्र, पदक आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
बेळगाव उपविभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र करलिंगन्नावर, अँटी करप्शन ब्युरोचे एसीपी अडीवेश गुडीगोप्प, बेळगाव डिस्ट्रीक्ट रोलर स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील, श्रीमती अक्षता पाटील, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलेकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर, तुकाराम पाटील, श्रीमती पठाडे, श्रीमती माडीवाले, चौगुले, तसेच श्री शिवाय फाउंडेशन ग्रुप आणि इफिशियंट ग्रुप बेलगामचे सदस्य यांच्या उपस्थितीत स्पर्धेला चालना देण्यात आली.

1000 मीटर रिंक रेस स्केटिंग प्रकारात 5 वर्षांखालील वयोगटात मुलांच्या विभागात लोकेश पाटील याने एक सुवर्ण, शौर्य पाटील याने एक रौप्य तर अधिराज कामते याने एक कास्यपदक तसेच मुलींच्या विभागात साई बेळगावकर हिने एक सुवर्ण, द्विती वेसणे हिने एक रौप्य तर गाथा दड्डीकर हिने एक कांस्यपदक मिळविले.
5 ते 7 वयोगटात मुलांच्या विभागात आण्विक शिंगडी याने एक सुवर्ण, श्रीयंश पांडे याने एक रौप्य तर भागार्थ पाटील याने एक कास्यपदक तसेच मुलींच्या विभागात जिया काजी हिने एक सुवर्ण, दिया सोंकद हिने एक रौप्य तर अनन्या पाटील हिने एक कास्य पदक मिळविले.
7 ते 9 वयोगटात मुलांच्या विभागात आर्या कदमने एक सुवर्ण, समीध कनगली याने एक रौप्य तर ध्रुव पाटील याने एक कास्यपदक तसेच मुलीच्या विभागात आराध्या पी. हिने एक सुवर्ण, प्रांजल पाटील हिने एक रौप्य तर श्राव्या पाटील हिने एक कास्य पदक मिळविले.
9 ते 11 वयोगटात मुलांच्या विभागात अवनीश कामन्नावर याने एक सुवर्ण, सर्वेश पाटील याने एक रौप्य तर कुलदीप बिर्जे याने एक कास्यपदक तसेच मुलींच्या गटात तन्वी मोहिते हिने एक सुवर्ण, सलोनी पाटील हिने एक रौप्य तर राजनंदिनी नागवे हिने एक कास्य पदक मिळविले.

11 ते 14 वयोगटात हनुमंतप्पा यांने एक सुवर्ण, सौरभ साळुंखे याने एक रौप्य तर गौरांग खोत त्याने एक कास्यपदक तसेच मुलींच्या विभागात जान्हवी तेंडुलकर हिने एक सुवर्ण, अनघा जोशी हिने एक रौप्य तर अमरीन ताज हिने एक कास्य पदक मिळविले.

14 ते 17 वयोगटात यशवर्धन परदेशी याने एक सुवर्ण, हर्षवर्धन दाभाडे याने एक रौप्य तर श्री रोकडे याने एक कास्यपदक तसेच मुलींच्या विभागात साक्षी रामनकट्टी हिने एक सुवर्ण, विशाखा फुलवाले तिने एक रौप्य तर सानिका कंग्राळकर हिने एक कांस्य पदक पटकावले.

17 वर्षांखालील वयोगटात मुलींच्या विभागात सौम्या कामते हिने एक सुवर्ण, श्रेया वाघेला हिने एक रौप्य तर शिवानी राजपूत हिने एक कास्यपदक तसेच मुलांच्या विभागात सागर पराटे याने एक सुवर्ण, अमर नाईक यांने एक रौप्य तर राजीव सरकार याने एक कास्यपदक मिळविले.Sketing

ईनलाइन स्केटिंग प्रकारात 5 वर्षांखालील मुलींच्या गटात प्राजक्ता पाटील हिने एक सुवर्ण, आर्या होनन्नवर हिने एक रौप्य तर प्रियांका मनिकंठ हिने एक कास्यपदक तर मुलांच्या विभागात आरुष अर्कसाली यांने एक सुवर्ण, प्रीतम पाटील याने एक रौप्य तर राजीव कुमार यांने एक कांस्यपदक मिळविले.
5 ते 7 वयोगटात मुलांच्या विभागात विधीत कल्याकुमार बी याने एक सुवर्ण, विधीत पोवार याने एक रौप्य तर रुधव मोहिरे याने एक कास्यपदक तसेच मुलींच्या विभागात सिया एन. हिने एक सुवर्ण, कियारा जाधव हिने एक रौप्य तर वृषदा हिने एक कास्य पदक मिळविले.

7 ते 9 वयोगटात मुलांच्या विभागात अर्शन माडीवाले यांने एक सुवर्ण, समर्थ मराठे याने एक रौप्य तर विहान योग याने एक कास्यपदक तसेच मुलींच्या विभागात आराध्या बामनगोळ हिने एक सुवर्ण, राही निलज हिने एक रौप्य तर अनवी गौरवने एक कांस्यपदक पटकाविले.

9 ते 11 वयोगटात मुलांच्या विभागात प्रीतम निलज यांने एक सुवर्ण, विहान विहान कनगली याने एक रौप्य तर अवनीश कोरीशेट्टी याने एक कास्यपदक तसेच मुलींच्या विभागात अनन्या सहकारी हिने एक सुवर्ण, श्रावणी भिवसे हिने एक रौप्य तर अवनी सोनार हिने दोन कांस्यपदके पटकावली.
11 ते 14 वयोगटात मुलांच्या विभागात साईराज मेंडके याने एक सुवर्ण, अनराय ढवळीकर यांने एक रौप्य तर अथर्व भुते याने एक कास्यपदक तसेच मुलींच्या विभागात सानवी हिने एक सुवर्ण, श्रेया इरसन्नावर हिने एक रौप्य तर सिद्धी रामनकट्टी हिने एक कांस्यपदक पटकाविले.
17 वर्षांवरील वयोगटात मुलांच्या विभागात शुभम साखे याने एक सुवर्ण, सक्षम पाटील यांने एक रौप्य तर अविराज पाठक याने एक कास्यपदक तसेच मुलींच्या विभागात अनुष्का शंकरगौडा हिने एक सुवर्ण, मेहक मुल्ला हिने एक रौप्य तर वृषदा रजनीश तिने एक कांस्यपदक पटकाविले.
स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या क्रमांकांच्या विजेत्यांना प्रत्येकी प्रमाणपत्र, सुवर्णपदक आणि एक हजार रुपये रोख, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रमाणपत्र, एक रौप्य पदक आणि सातशे रुपये रोख तर तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना प्रमाणपत्र, कास्य पदक आणि पाचशे रुपये रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर तसेच योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, विशाल वेसणे, सक्षम जाधव, अजित शिलेदार, सुनिल खोत यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.