संजय घोडावत इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशनतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही आयोजित युनायटेड नेशन जनरल असेंबलीमध्ये बेळगावच्या ज्योती सेंट्रल स्कुलची विद्यार्थीनी कु. राशी सुरेन्द्र अनगोळकर हिने सर्वोतमामधील सर्वोत्तम विद्यार्थ्यासाठी असणारे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
संजय घोडावत इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशनच्या युनायटेड नेशन जनरल असेंबलीचे (अकॅडमिक सिम्युलेशन) कोल्हापूर येथे गेल्या 15 ते 17 एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले होते.
सदर असेंबलीमध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक विभागाच्या 153 सर्वोत्कृष्ट विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग दर्शविला होता. या सर्वांमध्ये सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना कु. राशी सुरेन्द्र अनगोळकर हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक हस्तगत केले.
कु. राशी ही शहरातील सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाऊंडेशनचे संस्थापक -अध्यक्ष आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांची कन्या आहे. उपरोक्त यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जागतिक नि:शस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा समिती, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद, संयुक्त राष्ट्र मानव हक्क परिषद, लोकसभा जागतिक व्यापारी संघटना आणि इंटरनॅशनल प्रेस हे सर्व संजय घोडावत इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशनचे सदस्य आहेत हे विशेष होय.