राज्यभरात एस एस एल सी परीक्षा सुरळीत पार पडल्या असून आता परीक्षा प्राधिकरणाचे लक्ष परीक्षेच्या निकालाकडे लागले आहे.या दहावीच्या परीक्षेचा निकाल 2 मे रोजी लागणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री बी नागेश यांनी दिली.
बागलकोटे आणि बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी विजापूर दौऱ्यावर असलेले शिक्षण मंत्री आलमट्टी येथे पत्रकारांशी बोलत होते.शिक्षण मंत्री म्हणाले की 28मार्च पासून सुरू झालेल्या परीक्षा संपल्या आहेत.
दहावीच्या परीक्षात एका परीक्षा केंद्रावर केवळ एकाच विध्यार्थ्याला बाहेर काढण्यात आले असून यावर्षी प्रथमच 98 टक्के विध्यार्थी परीक्षेला हजर झाले असून गैरहजर आणि पुनरपरिक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्याही नेहमी प्रमाणेच होती.गुणपत्रिका मूल्यांकन प्रक्रिया सुरू झाली असल्याची ते म्हणाले.
दहावीच्या परीक्षेचा निकाल 2 मे रोजी होणार असून जून महिन्याच्या अखेरीस पुरवणी परीक्षा घेण्यात येतील.या परीक्षेस मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार गणवेश परिधान
करावा लागणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे.