व्हॅक्सिन डेपो मैदानावर सुरू असलेल्या बॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत जियान स्पोर्ट्स विघ्नहर्ता स्पोर्ट्स जी जी बॉईज आणि सरकार स्पोर्ट्स गांधीनगर या संघाने प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे
सोमवारी या क्रिकेट स्पर्धेचे दोन उपांत्य सामने होणार असून मंगळवारी अंतिम सामना खेळवला जाणार आहे सोमवारी सकाळच्या सत्रात जियान स्पोर्ट्स विरुद्ध सरकार स्पोर्ट्स आणि दुपारीच्या सत्रात विघ्नहर्ता स्पोर्ट्स आणि जी जी बॉईज यांच्यात उपांत्य फेरीची लढत होणार आहे.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने वॅक्सिन डेपो मैदानावरवर क्रिकेट शौकिनांनी गर्दी केली होती पहिल्या सामान्यात जियान स्पोर्ट्स संघाने इंडियन बॉईज हिंडलगा संघाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला तर दुसर्या सामन्यात विघ्नहर्ता स्पोर्ट्स ने साईराज स्पोर्ट्सला हरवत करत आपले स्थान सेमीफायनलमध्ये पक्के केले.
दुपारच्या सत्रात झालेल्या सामन्यात जी जी बॉईज संघाने एस.आर. एस हिंदुस्थान स्पोर्ट्स वर विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला तर शेवटच्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात सरकार स्पोर्ट्स ओल्ड गांधी नगर संघाने मोहन मोरे संघाचा पराभव करत सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला.
रविवारी दुपारच्या सत्रात आमदार अनिल बेनके यांनी सामनावीराचा पुरस्कार बहाल केला तर आणखी एका सामन्यात भाजप नेते राहुल मुचंडी यांच्या हस्ते सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.युवा सामाजिक कार्यकर्ते संजय कडोलकर, संदिप चौगुले यांच्या हस्ते मॅन ऑफ दि मॅच पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोमवारी या स्पर्धेचे उपांत्य सामने होणार आहेत आणि मंगळवारी अंतिम सामना खेळला जाणार आहे.