बेळगाव शहरातील पृथ्वीसिंग फाउंडेशनने मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त एका युवकाला आर्थिक सहाय्याबरोबरच वन टच फाउंडेशनच्या सहकार्याने जीवनावश्यक साहित्याची देखील मदत देऊ केली.
शहरातील सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीसिंग यांनी आपल्या पृथ्वीसिंग फाउंडेशनतर्फे हालप्पा निंगाप्पा उचगांवकर या या 27 वर्षीय मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त युवकाला आर्थिक मदत केली आहे.
घरची परिस्थिती बेताची असलेल्या हालप्पा याच्यावर बीम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मूत्रपिंड निकामी झाले असल्यामुळे गेल्या 5 वर्षापासून तो डायलेसिसवर आहे. पृथ्वीसिंग यांनी त्याच्या 25 डायलेसिसचा खर्च उचलला आहे.
याबरोबरच पृथ्वीसिंग आणि वन टच फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील यांनी आजारी हालप्पा उचगांवकर त्याच्या कुटुंबासाठी जीवनावश्यक साहित्याची मदत देऊ केली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांना एफएफसी प्रमुख संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर, महादेव लाड, कल्पना सांवगावकर आदींचे सहकार्य लाभले