Friday, September 13, 2024

/

या गावात पाकिस्तानी चलनी नोट मिळाल्याने खळबळ

 belgaum

पाकिस्तान देशाचे नोट (चलन) मिळाल्याने करोशी गावात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी चिकोडी पोलिस तपास करीत आहेत.

चिकोडी तालुक्यातील करोशी गाव हे 12 ते 14 हजार लोकसंख्या असलेल्या गावात सर्व जाती धर्माचे लोक राहत असून येथील धार्मिक स्थळांना देशातील विविध भागातून लोक येत असतात.

या ना त्या कारणामुळे चर्चेत असणाऱ्या करोशी गावात चक्क पाकिस्तानी चलन मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी की गुरुवारी सकाळी 11 च्या दरम्यान एका युवकाला करोशी बस स्थानकावर रस्त्यावर पडलेली एक नोट मिळाली. सदर चलन पाकिस्तानी देशाचे असून त्यावर पाकिस्तान देशाचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे छायाचित्र असून त्यावर स्टेट बँक ऑफ पाकिस्तान असे इंग्रजीत व इतर मजकूर उर्दू भाषेत छापण्यात आला आहे.Pakistani note

तर सदर नोट ही 10 रूपयाची आहे. हे पाहून पाकिस्तान देशाची नोट असल्याचे त्या तरुणाच्या लक्षात आले.
यामुळे सदर तरुण आज चिकोडी पोलिस स्थानक गाठून पीएसआय यमनाप्पा मांग यांच्याकडे सोपवून याविषयी माहिती दिली.

सदर बाब गांभीर्याने घेऊन चिकोडी पोलिस व गुप्तचर खात्याने तपास सुरू केला आहे. करोशी गावात पाकिस्तानहुन कुणी आले आहेत का ? नोट कुठून आली? कुणी आणले. या मागे मोठे जाळे आहे का याविषयी पोलिस तपास करीत आहेत.
एकूणच करोशी गावात पाकिस्तानी नोट मिळाल्याने नागरिकांसह पोलीस खाते चक्रावून गेले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.