4 मे रोजी काढण्यात येणारी शिवचित्ररथ मिरवणूक शांततेत व शिस्तबद्धरित्या पार पडावी यासाठी शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या वतीने पोलीस आयुक्त बोरलिंगया एम.बी. यांच्या नावे मंगळवारी सकाळी 11 वाजता निवेदन देण्यात आले.
चित्ररथ मिरवणुकीत दरवर्षी येत असलेल्या कांही समस्याविषयी या निवेदनात सूचना करण्यात आल्या आहेत.पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांनी निवेदन स्वीकारले.निवेदनाचा स्वीकार करून पोलिस उपायुक्त यांनी चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत मिरवणूक मार्गाची पाहणी करून समस्यांवर तिथल्या तिथे अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येईल,तसेच अन्य सूचनाचे स्वागत करून महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.
चित्ररथ मिरवणुकीत दरवर्षी येणाऱ्या रहदारीच्या अडचणीविषयी विशेषत नरगुंदकर भावे चौकात उद्भभवणारी शिवरायांच्या चित्ररथाची कोंडी यावर उपाय म्हणून मारुती गल्लीच्या कोपऱ्यावरील नेहमीच मिरवणुकीला अडथळा ठरणारी पोलीस खात्याची बस थोड्या दूरवर थांबविल्यास अडचण दूर होईल,
चित्ररथ मिरवणूक मारुती गल्लीच्या पूर्व कोपऱ्यावर नरगुंदकर भावे चौकात आल्यानंतर कोणत्याही मंडळाने आपले सजीव देखावे करायचे नाहीत. जेणेकरून हे देखावे पाहण्यासाठी जनतेची गर्दी, चेंगराचेंगरी, टाळता येईल.
नेहमीच संघर्षाचा विषय राहिलेली मारुती गल्ली कांबळी खुंट येथे प्रत्येक चित्ररथाचा मुख्य मिरवणुकीतल प्रवेश हा गणपत गल्लीतून येणार्या आणि अर्बन बँकेकडून येणाऱ्या चित्ररथात संघर्ष असतो त्यामुळे त्या ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्याची नेमणूक करून एका नंतर एक अशी न्यायपुर्ण व्यवस्था केल्यास उद्भभणारे वादाचे प्रसंग टाळता येतील. त्यासाठी जाणकार पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक करावी
एखाद्या वैयक्तिक कार्यकर्त्याच्या हेकेखोरपणामुळे मिरवणुकीत चित्ररथासमोर वाद उपस्थित होतात अशा गोष्टीस संपूर्ण मंडळास जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्याआधी वस्तुस्थितीचे नीट विचार केला जावा, जेणेकरून या लोकवर्गणीतून केल्या जाणाऱ्या चित्ररथाचा आर्थिक फटका अन्य गरीब कार्यकर्त्यांना बसू नये,
चित्ररथासाठी मार्गाचे परवानगी मागत असताना मंडळाच्या कार्यकर्त्यांना नाहक पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागतात, ही गोष्ट टाळून मंडळांना सिंगल विंडोची व्यवस्था करावी.
चित्ररथाचे निर्मिती करताना मंडळाच्या कार्यकर्त्यांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. त्यामुळे गल्लीतून अमुक यावेळीच चित्ररथ बाहेर पडेल याची शाश्वती देता येत नाही, परंतु चित्ररथ लवकरात लवकर बाहेर पाडण्यासाठी सर्व शिवजयंती उसत्व मंडळे प्रयत्न करण्यात येणार आहेत.
प्रशासनाने आणि पोलीस खात्याने सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखत आणि जनहिताचा विचार करून वेळेच्या बंधनात पहाटे पर्यंत काहीशी शिथिलता आणावी. अशा विविध सूचनाचे निवेदन जिल्हा पोलीस आयुक्तांना देण्यात आले.मिरवणुकीच्या मार्गावरील जाहिरातचे बॅनर अडचणीचे ठरतात ते तात्पुरते हटवावेत अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा हाठवाव्यात चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी बाहेरच्या तसेच स्थानिक नागरिकांची गर्दी होणार असून त्यांना रात्रीच्या वेळी खाद्यपदार्थाची गरज भासणार आहे यासाठी सर्व हॉटेल, कॅन्टीन यांना रात्रभर व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी
यावेळी शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव सरचिटणीस जे बी शाहपुरकर उपाध्यक्ष मेघन लंगरकांडे राहुल जाधव, लोकेश रजपूत,प्रसाद मोरे, आदित्य पाटील, प्रसाद पुजारी,राजन जाधव,मिलिंद बसरीकट्टी,सारंग राघोचे रघुराम नौखंडकर ,किरण हलगेकर, यासह अन्य शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.