ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सीमावासीयांचे आधार स्थान शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावर जो सुनियोजित भ्याड हल्ला करण्यात आला
त्याचा बेळगावात निषेध केला जाणार आहे. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवार 9 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता श्री जत्ती मठ देवस्थान रामलिंग खिंड गल्ली येथे हल्ल्याच्या निषेध बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
निषेध बैठकीला शरद पवार प्रेमी आणि नागरिकांनी उपस्थित दर्शवावी असे आवाहन बेळगाव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमोल देसाई यांनी केले आले आहे.